पारोळा (प्रतिनिधी) येथील पिंप्री प्र उ सरकारी गायरान गावठाण गुरचरण जमीन बेकायदेशीर खरेदी विक्री गैरव्यवहार व बनावट कागदपत्र व दस्त तयार करुन आर्थिक मोठा भ्रष्टाचार झाल्याबाबत व संगनमताने बेकायदेशीर सरकारी जमीन विक्री केल्याबाबत अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करता टोलवाटोलवी करुन गैरवर्तवणूक केली आहे. म्हणून संबधित सर्व जबाबदार अधिका-यांवर वरील शासन निर्णयनुसार तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नाशिक येथील आयुक्त कार्यालयासमोर १ मे २०२१ रोजी ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील आत्मदहन कार्यक्रम करणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्हातील महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे व संबंधित सर्व महसुल विभागातील जबाबदार वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी तसेच एरंडोल येथील प्रांत विनय गोसावी आणि पारोळा तहसलिदार अनिल गवांदे संबधित जबाबदार अधिकारी यांनी पिंप्री प्र उ येथील सरकारी गायरान गावठाण गुरचरण जमीन गट नंबर १४० स.नं. ८४ मधील २४०० स्केअर फूट जागा बेकायदेशीर खरेदी विक्री गैरव्यवहार व बनावट कागदपत्र व दस्त तयार करुन आर्थिक मोठा भ्रष्टाचार झाल्याबाबत व संगनमताने ग्रामपंचायत शिपाई गोकुळ ओंकार विसावे व पाणी पुरवठा कर्मचारी युवराज नारायण विसावे सरपंच ग्रामसेवक यांनी बेकायदेशीर सरकारी जमीन विक्री केल्याबाबत या संबधित शासन निर्णय १ ते ४ अन्वये सदर महसुल अधिका-यांनी व वरिष्ठ अधिका-यांनी दाखल करताच १ महिन्याच्या कालावधीत संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु संबधित सर्व जबाबदार महसुल अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत कारवाई न करता टोलवाटोलवी करुन गैरवर्तवणूक केली आहे म्हणून संबधित सर्व जबाबदार अधिका-यांवर वरील शासन निर्णयनुसार तात्काळ कारवाई करावी तसेच संदर्भ १ ते ९ च्या पत्राच्या उल्लंघन व हलगर्जीपणा कर्तव्यात कसुर करुन दोषी शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी, तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांचा बचाव केला म्हणुन सबंधित तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा नाशिक येथील आयुक्त कार्यालयासमोर १ मे २०२१ रोजी ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील आत्मदहन कार्यक्रम करणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, पिंप्री प्र. उ येथे शासनाची सरकारी गावठाण गायरान जमीन ग्रामपंचायत शिपाई गोकुळ ओंकार विसावे व युवराज नारायण विसावे तसेच तत्कालीन ग्रामसेवक आर.व्ही. सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य कैलास राघो पाटील, मिरावाई कैलास पाटील तसेच तत्कालीन सरपंच रेशमा अवचित विसावे यांनी सरकारी जमीनीचे बनावट कागदपत्र, व खोटा ८ अ चा उतारा इतर बनावट दस्त बनवुन सदर सरकारी गायरान जमीन विक्री करण्यास ग्रामसेवकाने विक्री करण्याचा दाखला दिलेला आहे.
सदर पिंप्री येथील गट नंबर १४० स.नं. ८४ यामघील २४०० स्केअर फुट जागासंबधित सरपंच शिपाई ग्रामसेवक यांनी दुय्यम निबंधक कार्यालय पारोळा यांच्या कार्यालयात दिनांक २३ जानेवारी २०१७ रोजी बेकायदेशीर खरेदी विक्री केली आहे. त्याचप्रमाणे सबंधित गावातील आबा फकिरा पाटील याने सुध्दा सरकारी गायरान गुरचरण जमीन गट नंबर १४० स.नं. ८४ यातील ९०० स्केअर फूट जागा गावातील विरमान नारायण पाटील यांना बेकायदेशीर खरेदी विक्री करुन दिलेली आहे. या संबधित तक्रारदार गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी मागील १५ ते २० महिन्यापासुन वेळोवेळी जळगाव जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना अनेक तक्रारी व पुरावे खरेदीखत दस्त उपअधिक्षक मुमी अभिलेख यांचा मोजणी अहवाल नकाशा सादर केलेला आहे.
सदर जळगाव जिल्ह्यातील महसुल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे व संबधित महसुल विभागातील कनिष्ठ व वरिष्ठ लिपीक तसेच एरंडोल येथील प्रांत विनय गोसावी आणि पारोळा तहसिलदार अनिल गवांदे आणि संबधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सर्वांनी संगनमताने माझ्या तक्रार अर्जावरील कार्यवाही केली नाही. तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील अनेक पत्रे कारवाई बाबत आले आहेत ते दडपून ठेवलेले आहे. त्यावर सुध्दा कारवाई केलेली नाही. सदर महसुल विभागातील भ्रष्ट प्रांत अधिकारी विनय गोसावी व अष्ट तहसिलदार अनिल ग्वादे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन सरपंच ग्रामसेवक शिपाई यांच्याशी हातमिळविणी करुन आर्थिक लाभापोटी आर्थिक देवाणघेवाण करुन दोषीचा बचाव केलेला आहे
तक्रारदार गुलबाराव जगन्नाथ पाटील मागील २ ते ३ वर्षापासुन वेळोवेळी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत व संबधित महसुल विभागातील रविंद्र भारदे आणि एरंडोल प्रांत विनय गोसावी यांच्याकडे वेळोवेळी सर्व पुरावेनिशी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु संबधित अधिका-यांनी दोषींवर आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. संबधित जळगाव जिल्ह्यातील महसुल विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी अश्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी सरकारी गायरान जमीन विक्री गैरव्यवहारमध्ये जाणीवपूर्वक टोलवाटोलवी करुन कर्तव्यात कसुर हलगर्जीपणा केलेला आहे.
पिंप्री प्र.उ ता. पारोळा येथील सरकारी गायरान व गावठाण जमीन गट नं. १४० स.नं. ८४ मध्ये सरकारी जमीन बेकायदा शिपाई गोकुळ ओंकार विसावे आणि पाणी पुरवठा कर्मचारी युवराज नारायण विसावे यांनी सरपंच ग्रामसेवक यांना हाताशी घरुन सरकारी जमीनीची खरेदी विक्री करुन खोटे दस्त बनवणे व शासनाची फसवणुक करणे हा मोठा अपराध आहे. याबाबत मागील १५ ते २० महिन्यापासुन तक्रारदार गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या तक्रारी व जळगाव जिल्हाधिकारी राऊत यांचे पत्र वेळोवेळी महसुल विभाग जळगाव व प्रांत विभाग एरंडोल तहसिलदार पारोळा येथील वरिष्ठ अधिका-यांकडे देवून सुध्दा सदर संदर्भ पत्र १ ते ९ च्यानुसार अधिका-यांनी कारवाई केलेली नाही. म्हणून संबधित सर्व जबाबदार अधिका-यांवर १) शासन परिपत्रक क्र.जमीन ०३/२००९/प्र.क्र.१३/ज- पदिनांक ७ सप्टेंबर २०१ २) शासन परिपत्रक क्र. जमीन ७/२०१३ प्र.क्र. ३७४ ज-१ दि. १० ऑक्टोबर २०१३ ३) शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. १०७८/२६१६/७७७/ग-६, दिनांक २६/३/१९८४, ४) शासन परिपत्रक, महसुल व वन विभाग क्र. जमीन १०१९/१०१७/ प्र.क्र.५९/ज-१ दि.२८/६/१९९९ संदर्भ १ ते ९ च्या पत्राच्या उल्लंघन व हलगर्जीपणा कर्तव्यात कसुर करुन दोषी सरपंच ग्रामसेवक यांचा बचाव केला म्हणुन सबंधित महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे व प्रांत अधिकारी विनय गोसावी व तहसिलदार अनिल गवांदे यांच्यावर शासन निर्णय १ ते ४ नुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करायी अन्यथा १ मे २०२१ रोजी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे.