
धरणगाव (प्रतिनिधी) येथे श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. नव्या मालाला ७१५३ रुपये एवढा भाव मिळाला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह गावातील विविध मान्यवरांनी भेट दिली.
काटा पूजन श्रीजी जिनिंगचे संचालक नयनकुमार गुजराथी, जीवनसिंह बयस, सुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रा. आर. एन. महाजन, गुलाबराव वाघ, डी.आर.पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, मुर्तजा बोहरी यांनी भेट दिली. नीलेश चौधरी, शिल्पेश सराफ, निखिल बयस, सागर कर्वा, मुकेश बयस, गजानन साठे, किरण अग्निहोत्री, चेतन कोठारी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

















