TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात महापौरांनी राबविले ‘मनपा’ आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत स्वच्छता अभियान

आकाशवाणी चौक, महाराणा प्रताप चौक, रिंग रोड परिसर, महात्मा गांधी रोड, अजिंठा चौक, पिंप्राळ्याचा समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काल गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमन झालं. महानगरपालिकेतर्फे शहरातील अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या पूजेचे साहित्य तसेच मुर्त्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. आज सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी याठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई सुरू केली. तसेच महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत स्वच्छता अभियान राबविले.

संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थात गणपती बाप्पाचे काल महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी घरा-घरांत अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले. त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते महाराणा प्रताप चौक म्हणजेच रिंग रोड परिसर, टॉवर चौकाजवळील महात्मा गांधी रोड, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागांत महापालिकेच्या परवानगीने याही वर्षी बुधवार, दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारपासून शुक्रवार, दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्रीपर्यंत गणेशमूर्ती, पूजा साहित्य, प्रसाद, सुशोभीकरणासह पुष्पहार, विविध फळे यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती. मात्र, संबंधित विक्रेत्यांनी मालाच्या विक्रीनंतर आपापल्या दुकानातील कचरा, निर्माल्याची विल्हेवाट न लावता तो तेथेच रस्त्यावर टाकलेला होता. त्यामुळे आधीच ‘कोरोना’चे संकट आणि सतत कोसळणार्‍या पावसामुळे रोगराई उद्भवून त्या-त्या भागातील रहिवासी, नागरिकांपुढे कोणत्याही प्रकारे आरोग्याचा प्रश्न उभा राहू नये तसेच महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केलेला जळगाव शहर सुंदर अन् स्वच्छतेत सदैव अग्रेसर राहावे, हा संकल्प लक्षात घेऊन स्वजबाबदारी पार पाडण्यासाठी महापौर जयश्री सुनिल महाजन या स्वतः आज शनिवार, दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास हातात झाडू, फावडा घेऊन रस्त्यावर उतरल्या अन् शहर स्वच्छतेचे हे अभियान त्यांनी संबंधित चौक परिसराच्या ठिकाणी जाऊन राबविले. जवळपास तीन-साडेतीन तासांपर्यंत हे अभियान राबविण्यात येऊन संबंधित कचरा, निर्माल्याची महापालिकेच्या ट्रॅक्टर, घंटागाडी आदी वाहनांच्या मदतीने विल्हेवाट लावली.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी राबविलेल्या या स्वच्छता अभियानात महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी लोमेश धांडे, संजय अत्तरदे, सुरेश भालेराव, सूरज तांबोळी (रिंग रोड परिसर), रमेश कांबळे, रवी सनकत (बळीराम पेठ परिसर), नंदू साळुंखे (पिंप्राळा परिसर), वॉटर ग्रेस कंपनीचे नितीन पाटील, शोएब खाटीक व कर्मचारी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, अमित जगताप, प्रितम शिंदे, सागर सोनवणे, जयेश पवार, दीक्षांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते, स्वयंसेवक, तसेच विविध प्रभागांत नियुक्त महापालिका सफाई कर्मचार्‍यांचा वाटाही तितकाच मोलाचा राहिला. महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या या अभियानाची जळगावात दिवसभर सकारात्मक चर्चा होती. किंबहुना नागरिकांनी त्यांच्या या शहराप्रती असलेल्या संवेदनारूपी कृतीचे तोंडभरून कौतुकही केले.

रिंग रोड येथील महाराणा प्रताप चौकातील ‘विकास’चे दूध विक्रेते आनंद बडगुजर म्हणाले, की मी गेल्या २५ वर्षांपासून येथे दूध विक्री करतो. गणेशमूर्ती, पूजा साहित्य तसेच फूल विक्रेते कचरा व निर्माल्य तसेच सोडून निघून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरायची. मात्र, आज महापौर अन् महापालिका कर्मचार्‍यांच्या सतर्कतेतून श्रीगणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी सकाळीच हा चौक, रिंग रोड व आकाशवाणी चौकाचा परिसर संपूर्णपणे स्वच्छ केला गेला. खरे म्हणजे महापौर व महापालिकेची नागरिकांप्रती व्यक्त केली गेलेली ही कृतज्ञता म्हटली पाहिजे. महापौर व महापालिका कर्मचार्‍यांच्या या अभियानाचे मी मनापासून स्वागत करतो व धन्यवाद देतो.

महात्मा गांधी रोड परिसरातील विविध व्यापारी संकुलांतील विक्रेत्यांनी सांगितले की, हरितालिकेच्या आधीपासून या भागात विविध पूजा साहित्य, फळे विक्रीची दुकाने थाटली जाऊन श्रीगणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी संबंधित विक्रेते कचरा व निर्माल्य तसेच टाकून निघून जातात. याचा आम्हा दुकानदारांना मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा. मात्र, आज महापौर व महापालिकेतर्फे श्रीगणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी आमच्या दुकानांसमोर राबविल्या जाणार्‍या स्वच्छता अभियानाप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. हे अभियान यापुढेही असेच सुरू राहो, हीच अपेक्षा.

महापौरांची परमेश्वराला प्रार्थना

दरम्यान, या अभियानासंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की आजचे स्वच्छता अभियान हे माझ्या संकल्पाचाच भाग आहे. तो पूर्णतेसाठी मी महापालिका अधिकारी, सफाई कर्मचार्‍यांसह स्वयंसेवी संस्थांना सोबत घेत सदैव तत्पर व कटिबद्ध आहे अन् यापुढेही राहील. मी श्रीगणेशाला प्रार्थना करते, की आम्ही शहर स्वच्छतेच्या कार्यात सदैव प्रामाणिकपणे अग्रेसर राहूच. मात्र, ‘कोरोना’रूपी संकटातून आम्हा शहर व जिल्हावासीयांची कायमची मुक्तता कर व सर्वांना सुख-समृद्धी लाभून निरामय आरोग्य लाभू दे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“१२ आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं” : ऊर्मिला मातोंडकर

July 12, 2021

धरणगावातील राजपूत समाजाच्या तरुणांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट !

February 13, 2023

एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेसाठी २० लाखांचा निधी मंजूर !

March 19, 2023

“तुरुंगात असताना ‘त्यांनी’ माझा जीव वाचवला” ; भुजबळांनी सांगितला तुरुंगातील ‘तो’ किस्सा

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group