TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९२ टक्क्यांवर !

जिल्ह्यात ४७ हजार ३९६ बाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ५१ हजार २१२ बाधित रुग्णांपैकी ४७ हजार ३९६  रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानकारक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय व आरोग्य यंत्रणांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व आंगणवाडी सेविकांचेही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कौतूक केले असून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी नागरीकांनी जागरुक राहून शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

READ ALSO

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

जिल्ह्यात आज (12 ऑक्टोबर) रोजी 243 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 47 हजार 396 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.55 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 587 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 870 रुग्ण हे लक्षणे नसलेले तर अवघे 717 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये 399 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 411, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 396 रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात 192 रुग्ण असून गृह अलगीकरणात 1 हजार 471 रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेबरोबरच रुग्णांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, उच्चदर्जाचे उपचार, नागरीकांचे समुपदेशन व जनजागृतीसह प्रशासनास लोकप्रतिनिधी व नागरीकांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 हजार 854 बेड असून त्यापैकी 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेड असून 322 आयसीयु बेड निर्माण करण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजन वायु सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 350 इतकी असून आयसीयुमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 123 इतकी आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटी-पीसीआरद्वारे 99 हजार 708 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 25 हजार 787 अशा एकूण 2 लाख 25 हजार 495 संशयितांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. यापैकी 1 लाख 72 हजार 992 चाचण्या निगेटिव्ह तर 51 हजार 213 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 123 असून अवघे 167 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 230 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यु झालेल्या रुग्णांपैकी 1 हजार 79 रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 556 रुग्णांना जुने आजार (कोमॉर्बिड) होते. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.40 टक्क्यांपर्यंत खाली आला असून तो अजून कमी होण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
Next Post

महावितरणच्या पोलला ट्रकची धडक ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहिती अधिकार कायदा सर्व सामान्यांसाठी हिताचा; पी डी पाटील

September 29, 2022

मुलाला गांजाचे व्यसन ; आईनं चेहऱ्यावर लावली मिरचीपूड

April 5, 2022

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, पैसेही उकळले ; जळगावात एकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा !

March 9, 2023

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकलच्या टँकरला भीषण आग, 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा होरपळून मृत्यू !

June 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group