TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारूच्या पैशाची उधारी जीवावर बेतली, चौघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) दारूच्या पैशाच्या उधारीवरून चौघांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. राजू सुदाम कोळी (वय ३२, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातील वाल्मीक नगरातील रहिवासी सुदाम कोळी यांचा मुलगा राजू कोळी याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. राजूच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी साशंकता निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे कळतेय. शहरातील वाल्मीक नगर भागात राजू कोळी राहतो. त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना २३ एप्रिलला दुपारी घडली होती. राजू सुदाम कोळी हा चार भाऊ आणि आईसह राहतो. त्याला २३ एप्रिलला दुपारी लहान भाऊ गणेश उठवण्यासाठी गेला. पण राजू उठला नाही. गणेशने परिसरातील नागरिकांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी येत खात्री केली असता राजूचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

ही घटना घडण्यापूर्वी राजुचे भाऊ पानसेमल येथे गेले होते. गणेशने माहिती दिल्यावर सर्वजण तातडीने घरी परतले. त्यांनी राजूचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेला. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा केला. राजूच्या मानेवर, कानावर व पाठीवर मारहाणीच्या खुणा आढळल्या. रक्ताचे डागही दिसून आले. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे लक्षात येत होते. अधिक तपास केल्यानंतर सत्य समोर आले.

मृत तरुणाचा भाऊ राकेश सुदाम कोळी (वय २३, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दारूच्या उधारीच्या पैशांमुळे तीन दिवसांपूर्वी राजूचे भांडण झाले होते. चौघांनी शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी राजूला मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास राजू हा दारू पिण्यासाठी किस्मतनगर येथे गेला असता सुंदरवाडी रोडवर चौघांनी अडविले. त्यानंतर पुन्हा शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात राजूच्या डोक्याला, पाठीला, पोटाला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली.

मारहाण होत असल्याचे लक्षात येताच त्याला त्याच्या भावांनी सोडविले. त्यानंतर राजू याला गंभीर अवस्थेत घरी आणले. यावेळी त्याच्या कानातून रक्त येत होत होते. तर डोळाही सुजला होता. जखमी राजूला घरातच झाेपविण्यात आले. सायंकाळी तो झोपेतून उठत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी राजूला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सोमवारी दुपारी ४ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

'प्री वेडिंग शूटिंग' बंदी... जळगाव जिल्ह्यातील 'या' दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा भारतीय जनता पार्टीतर्फे ‘मेरा देश मेरी मिट्टी’ कार्यक्रम उत्साहात !

August 9, 2023

अमळनेरात धाडसी चोरी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

March 1, 2022

बोदवड नगरपंचायतीतील चार प्रभागांसाठी मतदानाला सुरुवात

January 18, 2022

मार्केट यार्ड आडत असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशिकांत बियाणी

August 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group