धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका सकल मराठा समाजाची बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पी एम पाटील यांनी सांगितले. राजकारण विरहित समाजासाठी सेवाभावी कामकरण्यासाठी तरुणांनी एक संघटित होऊन सेवाभावी काम करावे, निवडणुकीत ज्याने-त्याने त्याला ज्या पक्षाचे करायचे त्यांनी करावे, परंतु समाजाच्या कार्यासाठी राजकीय जोडे बाहेर काढून काम करावे, धरणगावी सुसज्ज असे मंगलकार्य बांधकामाच्या संकल्प असून अनेक समाज बांधव देणग्या देण्यासाठी उत्सक असुन लवकरच याचा शुभारंभ सुद्धा करण्यात येणार असल्याचे पी एम पाटील यांनी सांगितले.
मुसळी येथील समाधान सिताराम पाटील, साखरे येथील भगवंत पाटील, धरणगावचे आर एच पाटील यांनीही मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अरवींद्र देवरे आबा, मुसळीचे गोकुळ पाटील, गंगापूरीचे महेश पाटील, पंढरी पाटील, साळव्याचे बापू पाटील, अँड संदीप पाटील, सोनवदचे प्रेमराज पाटील, दामू अण्णा पाटील, निलेश पाटील, निंभोऱ्याचे देवीदास पाटील, वाकटूकीचे सरपंच रवींद्र पाटील, धरणगाव शहर अध्यक्ष दिलीप बापू पाटील, सचिव बापू जाधव, उपाध्यक्ष समाधान पाटील, तालुका सचिव अनोरे येथील प्रा.मंगेश पाटील, बोरगाव येथील नितीन पाटील, किशोर मराठे, पाळधी येथील अजय पाटील, आनोरा कल्पेश पाटील, साखरे कृष्णाराव पाटील, पिंपळे येथील संजय पाटील, सळवा देवेंद्र पाटील, भवरखेडे मनोहर पाटील, साकरे विश्वास पाटील, पथराड भगवान मराठे, रविंद बोरसे, गोकुळ लंके, सुधर्मा पाटील, कैलास पाटील, कमलाकर पाटील, नंदकिशोर पाटील, योगेश पी.पाटील, बापू पाटील, राकेश पाटील, नामदेव पाटील, हिलाल पाटील आदी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. प्रास्ताविक प्रा.मंगेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप पाटील यांनी केले.
















