TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींना आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट !

जळगाव जिल्ह्यातील पहिली रेसलिंग मॅट आता चाळीसगाव शहरात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in क्रीडा, चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) खानदेशातील कुस्तीप्रेमींची चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सह अनेक दिग्गज नामवंत मल्ल देणाऱ्या चाळीसगाव तालुक्यात मातीतली कुस्ती आजपर्यंत खेळली जात होती. काळ बदलला तशी कुस्तीचे प्रकार बदलले आणि माती सोबतच मॅटची कुस्ती देशभरात होऊ लागली, शालेय तसेच राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर तर फक्त मॅटचीच कुस्ती होत असल्याने ज्या व्यायाम तालीमीत मॅट असेल तिथे जाण्याचा पैलवानांचा ओघ वाढू लागला. मात्र संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक रेसलिंग मॅट नसल्याने कुस्तीप्रेमींची मोठी निराशा होती. गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याकडे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद असूनदेखील चाळीसगाव येथे अत्याधुनिक रेसलिंग मॅट उपलब्ध नसल्याने पैलवानांची मोठी गैरसोय होत होती. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चाळीसगाव शहरात रेसलिंग मॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला असून कुस्तीची मोठी परंपरा असणाऱ्या शहरातील हनुमानवाडी स्थित जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला त्यांनी ४ लाखांची रेसलिंग मॅट भेट दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील हि पहिली रेसलिंग मॅट असून तिचे नुकतेच उद्घाटन आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने तसेच आता मॅटच्या कुस्तीसाठीचे सराव करणे सोपे होणार असल्याने सर्व चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

READ ALSO

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

सदर उद्घाटन प्रसंगी कृषी उतपन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पदाधिकारी मनोहरदास बैरागी पैलवान, दीपक शुक्ला, अण्णा कोळी, अण्णा गवळी, तमाल देशमुख, किरण देशमुख, सतीशनाना पवार, सुधाकर पालवे, माजी नगरसेवक नितीन पाटील, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, बबन पवार, आबा पोलीस, जितेंद्र वाघ, संभाजी घुले, कुणाल कुमावत, राहुल पाटील, सचिन दायमा सर, बंडू पगार, भरत गावडे, संभा पाटील, पिंटू पाटील, रवींद्र शुक्ल यांच्यासह तालुकाभरातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

कुस्तीसाठी बोलून नाही तर करून दाखवणार : आमदार मंगेश चव्हाण !

मी बोलून नाही तर काम करून दाखवणारा कार्यकर्ता आहे, चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीचे संवर्धन करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. काही महिन्यांपूर्वी आमदार केसरी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून तालुक्यातील खेळाडूना मैदान उपलब्ध करून दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याला जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद असूनही एकही रेसलिंग मॅट नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली होती, कुणी काय केले काय नाही केले यात न पडता आपण काय करू शकतो यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय निधीचे आश्वासन न देता एक कर्तव्य म्हणून ४ लाखांची रेसलिंग मॅट जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला उपलब्ध करून दिली आहे, त्याचा तालुक्यातील सर्व मल्लांनी लाभ घ्यावा व पै.विजय चौधरी यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळीसगावचे नाव उंचवावे, पुढील काळात देखील कुस्तीसाठी जे काही करता येईल ती सर्व मदत करेन अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिली.

आमदार मंगेशदादा चव्हाण आम्हा कुस्तीगिरांसाठी देवदूत – पै.बैरागी

आमची व्यायामशाळा ४० वर्षाहून अधिक जुनी असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुले तालीमीसाठी येतात, आमच्या व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत स्पर्धेत भाग घेतला आहे मात्र आता शालेय स्तरावर तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावर मैदानी एवजी मॅटची कुस्ती होत असल्याने चाळीसगाव येथे रेसीलिंग मॅट मिळावी यासाठी आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी मंगेशदादा चव्हाण यांना विनंती केली असता त्यांनी रेसलिंग मॅटचे आश्वासन दिले होते. निवडणुकीत अनेक पुढारी आश्वासन देतात आणि विसरून जातात हा यापूर्वीचा अनुभव होता. मात्र आमदार झाल्यांनतर मंगेशदादा चव्हाण यांनी आमची वेळोवेळी विचारपूस केली व रेसलिंग मॅट कुठे चांगल्या दर्जाची मिळेल याची चौकशी करण्याचे सांगितले तसेच सदर रेसलिंग मॅट बसविण्याची जबाबदारी देखील आपल्या कार्यकर्त्यांना दिली. आज प्रत्यक्ष मॅट उपलब्ध झाल्याने गेल्या अनेक वर्षांचे आमचे स्वप्न पूर्ण झाले असून जळगाव जिल्ह्यातील पहिली रेसलिंग मॅट चाळीसगाव मध्ये बसल्याने सर्व कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. खऱ्या अर्थाने आमदार मंगेशदादा चव्हाण आम्हा कुस्तीगिरांसाठी देवदूत ठरले असल्याची भावना जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पै.मनोहर बैरागी यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

June 16, 2025
चाळीसगाव

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

June 14, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
चाळीसगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बनावट जॉईनिंग लेटर देऊन तरुणीची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2025
क्रीडा

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
Next Post

धरणगाव रोडवरील रेलच्या मारुती मंदिरात चोरी ; ५० हजाराचा ऐवज लांबविला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.आर.हायस्कूलने केला माजी विद्यार्थी लड्डाख सीमेवरच्या जवानाचा सत्कार !

December 1, 2020

शिर्डी साई संस्थानाने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा फलक काढणारच : तृप्ती देसाई

December 10, 2020

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकारांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचा शुभारंभ

May 9, 2021

ज्ञानवापी मशिदीच्या निकालावर ओवैसींची प्रतिक्रीया ; म्हणाले…!

May 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group