TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील या राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. तीन परिचारिकांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 पर‍िचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथ‍ील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांचे प्रभावीर‍ित्या अंमलबजावणी केलीली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती जाधव यांनी क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान‍ित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. श्रीमती पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले आहे.

पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांना ही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सद्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुर्नवसन झालेल्या रूग्णांची सेवा श्रीमती कोरेकर यांनी केली आहे. वर्ष 2018 मध्ये त्यांना युनीसेफतर्फे लसीकरणाची अंमलबजावणी उत्कृष्ट करण्यासाठी अ दर्ज्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोव‍िड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध 4 पुरस्कार तर जागत‍िक आरोग्य संघटनेच्यावतीनेही पुरस्कृत करण्यात आले आहे.

अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहिर झाला होता. तथापि काही अपरीहार्य कारणास्वत त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रामा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोज‍ित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात श्रीमती धोटे यांनी महत्वपूर्ण भुमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2021 असून एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
Next Post

बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशी भिडले, बस स्थानकावर राडा ; भडगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २१ नोव्हेंबर २०२२ !

November 21, 2022

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे वेबिनार; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शन

December 24, 2020

जाणून घ्या… धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण !

July 28, 2022

धरणगावचे डॉ. लीलाधर बोरसेंच्या सेवेस १७ वर्ष पूर्ण ; गुलाबराव वाघांनी दिल्या शुभेच्छा !

October 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group