TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवलसिंगराजे पाटील : असा ‘सच्चा कार्यकर्ता’ प्रत्येक नेत्याला हवा असतो !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (दीपक भदाणे) राजकीय नेत्यांकडे हौसे, गवसे, नवसे यांच्यासह सुखावलेले, दुखावलेले अगदी निर्ढावलेले श्रेणीतील कार्यकर्ते असतात. पण असं म्हटलं जाते की, निष्ठावान कार्यकर्ता मोजूनही सापडत नाही, मग पक्ष आणि नेता कोणताही असू द्या. परंतू काही कार्यकर्ते नेत्यांसह सर्वसामान्य माणसांच्या मनातही घर करत असतात. असचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या बाबतीत देता येईल.

राजकारणात व्यक्तीपेक्षा पक्ष महत्वाचा असतो. याच पद्धतीने सच्च्या कार्यकर्त्यापेक्षा समर्पित कार्यकर्त्याला नेते देखील जीवाभावाचा मानतात. पक्षाच्या वाढीला, पक्षसंघटनेला बळ देण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्या नेत्याप्रती एकनिष्ठ असेलल्या समर्पित कार्यकर्त्याने नेत्याच्या अनुपस्थित सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांचा उपक्रम गुलाबभाऊंच्या गैरहजेरीत असाच काहीसा असतो. गुलाबभाऊ मतदार संघात नसले तरी नवलभाऊ त्यांची अनुपस्थित कुणालाही जाणवू देत नाहीत.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

गुलाबभाऊंचे अनेक उपक्रम मतदार संघात कायमच सुरु असतात. परंतू अनेकदा मंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे त्यांना मुंबईसह राज्यभरात फिरावे लागते. मग या काळात नवलभाऊ प्रत्येक उपक्रम व्यवस्थित सुरु आहे की नाही?, याची स्वतः माहिती घेत असतात. बऱ्याचदा ते कार्यक्रम स्थळी हजेरी लावतात. नुकताच वडनगरी येथे प्रदीपजी मिश्रा यांचे शिवपुराण कथेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून नवलभाऊने दररोज आढावा घेत होते.

अगदी मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीचा फोन आला असेल तर प्रत्येकाचा निरोप पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याच कामही नवलभाऊ करत असतात. अगदी पालकमंत्र्यांच्या राजकीय विरोधकांना देखील सन्मानाने वागणूक देत असतात. त्याच्या याच गोड स्वभावामुळे दोडे गुर्जर प्रीमिअर लीग सुरत : पर्व 5 मध्ये त्यांना ‘गुर्जर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सध्याच्या राजकारणातील स्वार्थी दुनियेत नि:स्वार्थ भावनेने काम करणारा कार्यकर्ता नेत्याच्या दृष्टीसही पडत नाही. परंतू आजच्या बदलत्या राजकीय वातावरणात नि:स्वार्थी, साधेपणाने वावरणारे मोजके चेहरे देखील कधीकधी आपल्या नजरेस पडत असतात. नेत्याप्रति प्रामाणिक राहत चांगुलपणाने चांगलं काम करणारी काही माणसंही समाजात असतात, याचीच प्रचीती नवलसिंगराजे पाटील यांच्या निमित्ताने येते. नवलभाऊ यांना ‘गुर्जर गौरव’ पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे त्यांचे खूप-खुप अभिनंदन !

– दीपक भदाणे (बिलखेडा, युवासेना तालुका प्रमुख)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील तरुणाची पाकिस्तानसाठी हेरगिरी ; मुंबई एटीएसकडून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सचिन वाझेंना सरकारी सेवेत घेण्यात यावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला : देवेंद्र फडणवीस

March 17, 2021

राष्ट्रवादीचा भाजपला झटका, कल्याण काळे घड्याळ बांधणार?

December 19, 2020

धरणगाव प्रशासनाकडून निघालेल्या मतदान जनजागृती रॅलीत बालकवी ठोंबरे व कुडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 8, 2024

कंगनाला आली मुंबईची आठवण; घोडेस्वारीच्या आठवणींना उजाळा

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group