TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वल्गना नव्हे, आमचा प्रत्यक्ष कामांवर भर : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगावात ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या कामास प्रारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आता निधी येईल, तेव्हा येईल अशा बतावण्या न करता आम्ही वल्गनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामांवर भर देतो. यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांसाठी १२० कोटी रूपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला असून याच्या कामास शुभारंभ करण्यात आला आहे. तर उर्वरित निधीचा पाठपुरावा सुरू असून शहरासाठी तब्बल पावणे दोनशे कोटी रूपयांची कामे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

 

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये २ आज १ कोटी ३५ लक्ष रूपयांची तरतूद असणार्‍या तीन रस्त्यांच्या भूमिपुजनाप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, जळगाव शहराच्या विकासाचे व्यापक व्हिजन लक्षात घेऊन आम्ही कोणतीही आव न आणता प्रत्यक्ष कामे करून दाखवत आहोत. जळगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर नितीन बरडे हे जनतेच्या कायम संपर्कात राहून कामे करणारे नगरसेवक असल्याचे नमूद करत ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन होत्या.

 

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये २ कोटी ७५ लक्ष रूपयांची विकासकामे मंजूर झालेली आहेत. यातील १ कोटी ३५ लाख रूपयांच्या निधीतून स्टेट बँक कॉलनी आणि पवन हिल्स परिसरातील एकूण तीन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अनंत जोशी, प्रशांत नाईक, कुंदन काळे, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला महानगराध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे , डॉ कमलाकर पाटील, मुकेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.

 

नगरसेवक नितीन बरडे यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे आम्ही विकासनिधीसाठी शब्द टाकल्याबरोबर त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी भरभरून निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र ठाकरे यांनी केले तर आभार नितीन बरडे यांनी मानले. यावेळी प्रभागातील नागरिकांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

 

जळगाव विकासासाठी असा मिळाला निधी

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव शहरासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ६१ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तर अलीकडेच नगरविकास खात्याच्या माध्यमातून ४१ कोटी रूपयांचा निधी देखील मिळालेला आहे. यासोबत रस्त्यांसाठी २० कोटी रूपयांचा निधी मिळालेला आहे. तर उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. या माध्यमातून जळगाव शहरात तब्बल पावणे दोनशे कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून आज जळगावातील भूमीपुजनाच्या माध्यमातून याला प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंतर्नादतर्फे आजपासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला; प्रथमपुष्प पुण्याचे कवी देवा झिंजाड गुंफणार

December 14, 2020

३८ हजार शेतकऱ्यांनी केला ३७ कोटींचा भरणा

March 18, 2021

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

April 4, 2022

कॅफेतील केबिनमध्ये तरुणाईचे अश्लील चाळे ; कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group