जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने आज जळगांव येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसीमध्ये असलेल्या बारा बलूतेदार समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्याने सहभागी झाले होते.
या मोर्चाची प्रमुख मागणी होती की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सन्मानाने आरक्षण द्या… पुणे येथील भिडे वाड्यात क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांचे राष्ट्रीय मोठे स्मारक व्हावे… या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यासाठी हा जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.