TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य, स्नेहभोजनाच्या निमित्ताने लाभला अनमोल “सहवास”

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती क्रांती सेनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचा लग्नाचा व मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “सहवास – अ केअर” संस्थेतील अपंग व मतिमंद मुलांना स्नेहभोजन दिले. त्यांच्या सोबत केक कापून आणि जेवण करून मित्रपरिवार व कुटुंबियांसोबत आनंददायी व संस्मरणीय कार्यक्रम संपन्न झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल – कासोदा मार्गावर वनकोठे गावापासून थोड्या अंतरावर सहवास बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे. यामध्ये “सहवास – अ केअर” च्या अंतर्गत २१ अपंग व मतिमंद मुलांचा सांभाळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान सावंत व त्यांचे संपूर्ण सावंत कुटूंब (रा. सोनबर्डी) करीत आहेत. ‘वेद वाचता येतात, वेदना वाचता आल्या पाहिजेत कारण ज्याला वेदना वाचता येतात तोच संवेदना ठेऊन काम करू शकतो” याचा प्रत्यय सावंत कुटुंबियांना भेटून याची देही, याची डोळा।। या उक्तीप्रमाणे जाणवतो. लक्ष्मण पाटील यांनी जेव्हा त्यांचे मित्र व मार्गदर्शकांसोबत या संस्थेबाबत चर्चा केली तेव्हा सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. १० डिसेंबरला लग्न आणि मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या संस्थेतील मुलांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रम करावा याबाबत नियोजन करण्यात आले. सहवास संस्थेत गेल्यानंतर जो अनुभव आला तो शब्दांत वर्णन करण्याचा पलीकडे असाच होता. त्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर उमललेल्या हास्याच्या पुढे सर्व धनसंपत्ती फिकी पडावी असा अविस्मरणीय अनुभव यानिमित्ताने आला.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

कार्यक्रमाच्या सुरवातीला ज्या कुटुंबियांच्या समर्पित वृत्तीने संस्थेचे कार्य मागील ५ वर्षांपासून अविरत आणि अखंडपणे सुरु आहे, अशा सावंत कुटुंबियांचा शाल, महापुरुषांचे चरित्र ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करून त्यांच्या कार्यप्रति आदरभाव व्यक्त करण्यात आला. यामध्ये संस्थापक अध्यक्ष समाधान सावंत, त्यांचे वडील हिलाल सावंत, आई रंजना सावंत, पत्नी मनिषा सावंत, मोठे बंधू विश्वनाथ सावंत, वहिनी आरती सावंत आणि सहकारी धनंजय भोसले या सर्वांचा सन्मान करण्यात आला. त्यांनतर विवेक याचे औक्षण करण्यात आले. केक कापून संस्थेतील अपंग व मतिमंद मुलांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुलांना केक, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स आणि स्नेहभोजन देण्यात आले. त्यांच्यासोबत आयोजक व संयोजकांनी देखील दोन घास खाल्लेत. त्या मुलांच्या चेहऱ्यावर असलेलं हास्य आणि तृप्तीचे समाधान स्पष्टपणे जाणवत होते.

या अतिशय देखण्या कार्यक्रम प्रसंगी “सहवास – अ केअर” संस्थेचा कार्यभार सांभाळणारे सावंत कुटुंबिय, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील व त्यांचे कुटुंबिय, AVB माझा चे तालुका प्रतिनिधी आबासाहेब राजेंद्र वाघ व त्यांच्या पत्नी ललिता राजेंद्र वाघ, महात्मा फुले हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील व हेमंत माळी, प्रताप महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र मराठे, श्री क्लिनिकल लॅबोरेटरी चे संचालक नरेंद्र पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी निलेश पवार, साई इंटरप्राइजेसचे विक्रम पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक महाजन यांच्यासह ‘सहवास संस्थेतील’ सर्व निरागस व निष्पाप मुले उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील तर आभार प्रदर्शन समाधान सावंत यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ येथे निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर : गोपाल शरण गर्ग

September 24, 2020

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत २७६ रुग्णांचा मृत्यू

September 27, 2021

विलासराव देशमुख अभय योजनेचा तीन लाख वीजग्राहकांना होणार लाभ !

March 20, 2022

महिला कंडक्टरसह बस चालकाला मारहाण ; अडावद पोलिसांकडून तरुणाला अटक !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group