TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीत मुस्लीमसह सर्वधर्मिय समुदायाचा निलेश राणेंच्या विरोधात उद्रेक !

कव्वालीसह पालकमंत्र्यांचा अपमान केल्याचा जोरदार आंदोलनाने निषेध

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर अतिशय खालच्या स्तरावरून टीका करत भाजप नेते निलेश राणे यांनी कव्वालीसह पालकमंत्र्यांचा अपमान केल्याबद्दल येथील मुस्लीम समुदायातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आज शहरातून मोर्चा काढून राणेंच्या प्रतिमेला चपला – जोड्यांचा मार देऊन त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जोरदार घोषणबाजीने परिसर दणाणून निघाला होता.

भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर अलीकडेच अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली होती. ना. गुलाबरावजी पाटील यांनी पाळधी येथील कार्यक्रमात कव्वाली गायन केल्यामुळे ही टीका करण्यात आली होती. याचा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. याचीच तीव्र प्रतिक्रिया पाळधी येथे देखील उमटली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पाळधी येथे माजी पंचायत समिती सभापती व चळवळीचे कार्यकर्ते मुकुंदराव नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समुदायाय सह सर्वधर्मिय हजारो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चा काढून निलेश राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत कार्यालयापासून शहरातून मोर्चा काढण्यात आला. यानंतर राणेंच्या प्रतिमेला चपला-जोड्यांचा प्रसाद देऊन त्यांना निषेध करण्यात आला.

याप्रसंगी या निषेध आंदोलनात सहभागी झालेल्यांनी निलेश राणे यांच्यावर टीका केली. ना. गुलाबराव पाटील हे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व असून त्यांनी मुस्लीम समुदायाबाबत नेहमी न्यायाची भूमिका घेतली आहे. तर कव्वाली हे मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र मानली जात असून अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये कव्वालीचे गायन करण्यात येते. मात्र निलेश राणे यांच्या मनात मुस्लीम समुदाय आणि ना. गुलाबरावजी पाटील यांच्याबाबत मळमळ असल्यामुळे त्यांनी घृणास्पद टीका केली असल्याचा आरोप याप्रसंगी आंदोलकांनी दिला. राणेंनी आपल्या जीभला आवर घातला नाही तर मुस्लीम समुदाय अजून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला.

या निषेध आंदोलनात माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच हाजी सुलतान पठाण, हाजी फिरोज खान, हाजी यासीन पठाण, दानिश, माजी सरपंच अरुण पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख पिंटू कोळी, नारायण आप्पा सोनवणे, उद्योगपती दिलीपबापू पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, प्रशांत झंवर, माजी सरपंच अलीमभैया देशमुख, पप्पू शिंदे, धर्मेंद्र कुंभार, माजी सरपंच सोपान पाटील, किरण पाटील, सुरेश पाटील, बंडू नारखेडे, विभाग प्रमुख गोकुळ लंके, गोकूळ नाना पाटील, माजी सरपंच अलीम देशमुख, आत्मा तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील, संगोयोचे सदस्य संजय माळी, फुलपाट सरपंच हरिभाऊ पाटील, तुषार मोरे, सुनील भोई, सचिन माळी, सचिन माळी, शेख कालू, शेख शाकिर आदींसह अन्य मान्यवर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एका संशयास्पद मृत्यूचा तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप : शिवसेना

March 11, 2021

‘अनलॉक’बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पारित ; वाचा संपूर्ण माहिती !

June 6, 2021

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

May 14, 2021

वीजचोरी करणाऱ्या ३०१ जणांवर धडक कारवाई ; अमळनेर शहरात महावितरणची मोहीम !

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group