पाळधी (प्रतिनिधी) पटेल, देशमुख, देशपांडे (PDD) बिरादरीतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या कर्तुत्वाचा गौरव व्हावा यासाठी दि. १८ फेब्रुवारी २०२१ गुरूवार रोजी पाचोरा येथे दुपारी ३ वाजता सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. याबाबत पाळधीचे सरपंच संजु भैय्या देशमुख यांच्या निवासस्थानी चर्चा करण्यात आली.
यावेळी पीडीडीचे आरिफ देशमुख, शकील देशपांडे, इंजि. राजु पटेल, ईमरान देशमुख, डॉ. राजु देशमुख, महेमुद अहेमद देशमुख, सलीम देशमुख, बबलु देशमुख, अंसार देशमुख, ज़ुबेर देशमुख, आबिद देशमुख, जावेद देशमुख, अकील देशमुख, सर्फराज़ देशमुख, मंजुर देशमुख, युनुस देशमुख,अलिम देशमुख, शोएब देशमुख, जुनैद देशमुख, इंजि.सुहैल देशमुख, नदिम पटेल, ज़िया देशमुख, यश देशमुख, उमर फारुख देशमुख, दानिश देशमुख यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित लोकं उपस्थित होते.