TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाच्या मृत्यूनंतर पिलखोडच्या महिलांचा ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय ; लवकरच होणार मतदान !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2022
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिलखोड येथे मद्यविक्री दुकानातच २३ वर्षीय तरुणाने चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर ग्रामस्थांनी गावात दारूला कायमची बंदी करण्याचा निर्धार केला असून शनिवारी बोलावलेल्या महिला ग्रामसभेत तब्बल ७०० महिलांनी दारू कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिल्यानंतर गावात दारूबंदी करण्याबाबत महिलांचे मतदान घेत निर्णय घेतला जाणार आहे.

देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कुणाल सोपान जाधव (वय २२) याने ३ रोजी याच दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी या तरुणाचा मृतदेह न हलवण्याचा पवित्रा घेतला हाेता. तसेच चाळीसगाव ते मालेगाव महामार्गावर ठिय्या देत रास्ताराेकाे करुन देशी दारू दुकान बंद करण्याची मागणी केली हाेती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अमोल मोरे व मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी तत्काळ ते दुकान सील केले हाेते. तर संबंधित विभागाकडे अहवाल पाठवला हाेता. दरम्यान, गावात दारू नकाेच, असा ग्रामस्थांनी निर्धार केला.
त्यासाठी ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेण्याचा मुद्दा आला. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या सर्व १५ पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जळगावचे उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांची भेट घेत घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायतीने शुक्रवारी घराेघरी महिला ग्रामसभेचे अजेंडे वाटले, दवंडी देवून जागृती केली. त्यानुसार शनिवारी सकाळी ९ वाजता गावातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात महिला ग्रामसभा झाली. ग्रामसभेत सुमारे ७०० महिला व २०० पुरूष उपस्थित होते.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

ग्रामसभेत महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. गावातील केवळ देशी दारू दुकानच नाही तर अवैधरित्या गावठी दारू व इतर सर्व अवैध धंदे बंद करण्याची महिलांनी एकमुखी मागणी केली. ग्रामसभेस सरपंच प्रकाश यशोद, उपसरपंच गोकुळ बाविस्कर, सदस्य सुरेश पाटील, भीमराव यशोद, गोरख बाविस्कर, संदीप मोरे, सुफियाबी पठाण, पुष्पाबाई पाटील, रत्नाबाई चौधरी, मंगलाबाई बाविस्कर, रूपाली पाटील आदी हजर हाेते. ग्रामसभेतील निर्णयानुसार पिलखोड येथील दारुबंदीचा ठराव जिल्हाधिकारी, जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांना सोमवारी देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे गावात दारूबंदीबाबत मतदान घेतले जाईल. त्यात दारुची उभी बाटली व आडवी बाटली अशा दाेन प्रकारची निशाणी असेल. आडवी बाटली म्हणजे दारूबंदीच्या बाजूने मतदान असेल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जे. आर. येवले यांनी िदली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

धरणगावात मुस्लीम बांधवाची निघाली भव्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा बुडून मृत्यू !

July 23, 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026

महावितरण आणि पुरवठा विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणी पूर्ण कराव्यात – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 28, 2025

उडाण फाउंडेशनतर्फे स्तनदा मातांना खजूर वाटप

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group