TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजकीय वर्तुळातील सकारात्मक बातमी : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

धरणगावात झळकले बॅनर...तापलेल्या राजकीय वातावरणात बरसल्या प्रेमाच्या सरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अवघ्या एका दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठी टशन बघायला मिळाली. परंतू दुसऱ्याच दिवशी तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेमाच्या सरी बरसल्याचे चित्र धरणगावकरांना बघायला मिळाले. निमित्त होते शिंदे गटाचे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख भैय्याभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे !. भैय्याभाऊ महाजन यांना ठाकरे गटाचे युवा सेनेचेच युवाउप जिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी शहरात शुभेच्छा फलक लावून जाहीर शुभेच्छा दिल्यामुळे गावाच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झालीय.

राजकारणापलीकडची मैत्री जपण्यात या देशात महाराष्ट्रच क्रमांक एकवर आहे. सुसंस्कृत आणि सभ्य राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळेच तर राज्याच्या राजकारणासह जिल्हा, तालुका पातळीवर देखील वेगवेगळ्या पक्षात राहून देखील अनेक राजकीय नेते मैत्री जपून असल्याचे आपण बघतो. जळगाव जिल्ह्यासह धरणगाव शहरात राज्यातील सत्तांतरापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष सुरु आहे. आंदोलन, एकमेकावर आरोप अगदी समोरासमोर भिडण्याचे देखील प्रसंग आलेत. परंतू अशा राजकीय संघर्षाच्या काळात देखील मैत्री जपली गेली पाहिजे. गावाला समाजाला सकारात्मक संदेश गेला पाहिजे, असचं काहीसं धरणगावात घडलं आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

शिंदे गटाचे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख भैय्याभाऊ महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियासह गावात मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक झळकले आहेत. रात्री ठाकरे गटाचे युवा सेनेचेच युवाउप जिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी देखील भैय्याभाऊ महाजन यांना सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्यात. पण सकाळी गावात जेव्हा योगेश वाघ यांनी लावलेले शुभेच्छा फलक धरणगावकरांनी बघितले तेव्हा मात्र, चर्चेला उधाण आले.

प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तर्क लावत होता. परंतू राजकारणात फक्त निवडणुकीपुरते मतभेद पाहिजे इतर वेळी मात्र, एकमेकाच्या सुख-दु:खात सहभागी झाले पाहिजे, अशाच सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. दरम्यान, भैय्याभाऊ माझा चांगला मित्र आहे. राजकारण आणि मैत्री ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशी प्रतिक्रिया योगेश वाघ यांनी दिलीय तर योगेशभाऊच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत असल्याचे भैय्याभाऊ महाजन यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथील धान्य दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक !

May 29, 2021

डेकोरेशनच्या गाडीला भीषण अपघात ; २२ जण टपावरुन कोसळले, एकाचा मृत्यू !

March 1, 2022

आर्मेनिया-अझरबैजान लढाईत १६ ठार

September 28, 2020

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 9 August 2023 !

August 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group