TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुलवाडी ते मुंढोदे पुलाबाबत दिलेला शब्द पाळून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे – रोहिणी खडसे

vijay waghmare by vijay waghmare
November 13, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी तर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे जन आशिर्वाद रॅली काढून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला रॅलीचा समारोप कॉर्नर सभेने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी रॅलीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांचे हर्षोल्हासात स्वागत केले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून उचंदे येथे अनेक विकास कामे झाली आहेत. भविष्यातही ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. उचंदे गावातील ग्रामस्थ स्व. प्रल्हाद भाऊ पाटील, स्व. पंढरीभाऊ पाटील, स्व. शामरावजी तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली कायम शरद पवार साहेबांच्या विचारांचे अनुयायी राहिले असून, नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देत आलेले आहेत. मागील निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या आदेशाने तुम्ही विद्यमान लोकप्रतिनिधींना साथ दिली त्यावेळी त्यांनी विविध आश्वासने दिली पण गेले पाच वर्ष सत्तेत राहूनही त्यांनी आश्वासनांची पुर्ती केली नाही. मतदार संघात फक्त कागदोपत्री कामे करून शासकीय निधीचा अपहार केल्या जात आहे. लोकप्रतिनिधी स्व खर्चातून शेतरस्त्यांचे कामे केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रत्यक्षात शेतरस्त्यांसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शासकिय निधी काढला गेला आहे. मी लोकप्रतिनिधी यांना सुलवाडी ते मुंढोदे पुल केल्यास सत्कार करेल असे आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांनी ते आव्हान स्वीकारून पुलाचे काम पूर्ण करेल आणि त्या पुलावरूनच मत मागायला येईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी नाबार्ड अंतर्गत पुलाला मंजुरी आणि पन्नास कोटी रूपये निधी मिळाल्याचे सांगुन पुलाचे भूमिपूजन करून आता रोहिणी खडसेंनी माझा सत्कार करावा असे सांगितले होते. मी आजही माझ्या शब्दावर ठाम असून लवकर पुल पुर्ण झाला तर त्यांचा सत्कार करेल. नुसती मंजुरी मिळून फायदा नाही त्यांनी सांगितल्या नुसार नाबार्ड अंतर्गत पुल मंजुरीचा आणि निधी मंजुरीचा शासन निर्णय दाखवावा. या पुलाला नाबार्डमधुन नाही तर ०४ हेड अंतर्गत मंजुरी मिळाली असून या हेडवर निधीची उपलब्धता फार कमी असते. यामधून निधी मिळून पुल पुर्ण व्हायला दहा ते पंधरा वर्ष लागतील. मग त्यांचा पुलावरून मत मागायला जायचा शब्द कुठे गेला? नाथाभाऊ यांनी खामखेडा पुलाचा शब्द दिला होता पाच वर्षात तो पुर्ण करुन दाखवला होता म्हणून आता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतात मतदारसंघाला पाच हजार कोटी रूपये निधी दिला त्या पाच हजार कोटी निधी अंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती द्यावी असे रोहिणी खडसे यांनी सांगून मतदार संघातील अनागोंदी कारभार थांबवून मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आ. एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुणदादा पाटील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवत असलेल्या निवडणुकीत मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली.
यावेळी कॉर्नर सभेत बोलताना तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर यांनी गेल्या निवडणुकीत आम्ही शरद पवार साहेबांच्या आदेशाने विद्यमान लोकप्रतीनिधींना निवडून दिले परंतु त्यांनी आमचा भ्रमनिरास केला शरद पवार यांची साथ सोडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सुद्धा साथ सोडली गेल्या पाच वर्षात मतदारसंघात सर्वत्र भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सुरु असल्याचे सांगुन मतदार संघाच्या विकासासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी विशाल महाराज खोले यांनी मतदारांशी संवाद साधताना, राज्यात जाती धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु हा संतांचा महाराष्ट्र असुन कट कारस्थानाना बळी पडणारा नाही तेच चित्र आपल्या मतदारसंघांत सुद्धा आहे परंतु मतदारसंघाची शांतता टिकवायची आहे. आपल्या मतदारसंघांत साडी वाटप करून माता भगिनींचे मत विकत घेण्याचा प्रयत्न झाला परंतु खोट्या आमिषाला बळी पडू नका आपल्या भगिनी रोहिणी खडसे यांना विजयी करा असे आवाहन केले.
याप्रसंगी विनोद तराळ यांनी मार्गदर्शन करताना आपला परिसर हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर असून शेत रस्त्यांची समस्या आहे, पुनर्वसनाची कामे बाकी राहिली आहेत ते रोहिणीताई खडसे या निश्चित सोडवतील अशी ग्रामस्थांना ग्वाही देऊन रोहिणी खडसे यांना गावातून मताधिक्य देण्याची विनंती केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटिल, पवनराजे पाटिल, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते मनोहर खैरनार, अविनाश पाटील, निलेश पाटील, विकास पाटील,रामभाऊ पाटील, माणिकराव पाटिल, साहेबराव पाटील, साहेबराव धनगर, किरण तायडे, राजेंद्र भोलाने,सद्दाम शेख आणि ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

आमच्या स्वप्नांचा आवाज मूक, पण आमचे समर्थन स्पष्ट ; शहरातील मूकबधिर बांधवांचे डॉ. अनुज पाटील यांना समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाखाहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात २७ कोटी वर्ग !

July 2, 2024

किनगाव अपघातातील मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

February 15, 2021

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

November 4, 2020

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे काळाची गरज : एस एस पाटील !

December 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group