जळगाव (प्रतिनिधी) कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून खासगी रूग्णालयात ऑक्सीजनची कमतरता पडत आहे. ऑक्सीजन पुरवठादारांनी ऑक्सीजन पुरवठा नियमित व तात्काळ करावा, अन्यथा ऑक्सीजन पुरवठा करण्यास टाळाटाळ व दिरंगाई करताना आढळून कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज आदेशात दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करत आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर वेळेवर व नियमित मेडिकल ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. तथापि शहरातील व जिल्ह्यातील काही खाजगी ऑक्सीजन पुरवठादार यांच्याकडून रुग्णालयांना त्यांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नियमित व तत्काळ ऑक्सिजन पुरवठा केला जात नसल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहेत.
वेळेवर रुग्णांवर ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याअनुषंगाने ऑक्सीजन पुरवठादारांनी खाजगी रुग्णालयांना नियमित व तात्काळ मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. ऑक्सीजन पुरवठा करण्यास टाळाटाळ व दिरंगाई करताना आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज आदेश काढले आहेत.