पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, जगदीश अशोक पवार याने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यापूर्वी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतू आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत तरुणीने पहूर पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली. त्यानुसार जगदीश पवार याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.