जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
मंत्री वडेट्टीवार यांचा दौरा असा : मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० वा जळगाव विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन. सकाळी ९.३० वाजता बऱ्हाणपूरकडे (मध्य प्रदेश) प्रयाण (मार्गे – जळगाव-भुसावळ- मुक्ताईनगर-हतनूर), दुपारी १.३० वाजता जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. दुपारी ३.४५ वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने (CJ२) मुंबईकडे प्रयाण करतील.