TheClearNews.Com
Tuesday, November 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा यांचे निर्देश

vijay waghmare by vijay waghmare
September 29, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

जळगाव (प्रतिनिधी) – संवेदनशील परिस्थितीत जळगाव परिमंडलातील कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी दक्ष राहा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) चंद्रमणी मिश्रा यांनी दिले.
महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात सोमवारी (28 सप्टेंबर) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे (जळगाव), अधीक्षक अभियंता संजय सरग (धुळे), अधीक्षक अभियंता सायस दराडे (नंदुरबार) यांची उपस्थिती होती. कार्यकारी संचालक मिश्रा म्हणाले की, कृषी ग्राहकांना नियमानुसार किमान 8 तास शक्यतो दिवसा वीजपुरवठा मिळेल, याची दक्षता घ्या. कृषिपंपांना वीज देण्याच्या निर्धारित वेळेत ती खं‍डित होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने करा. अनधिकृत वीजवापरावर नियंत्रण ठेवा. रोहित्रावर अतिभार येऊ नये यासाठी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. आपल्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींशी सुसंवाद ठेवा. प्रणाली सक्षमीकरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, वाहिनी विलगीकरण या योजनांच्या प्रगतीला वेग द्या, असे निर्देश मिश्रा यांनी दिले.
वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जाची सुविधा, अंदाजित खर्च यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि निवडसूचीवरील सौर कंत्राटदार प्रतिनिधींशी थेट संपर्क व समन्वय करण्यात येत आहे. प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे. नवीन घरगुती वीजजोडणी, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलणे, बिलावरील नावात बदल, मंजूर भार बदल, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये तांत्रिक उपाययोजना, देखभाल व दुरुस्ती आदी कामे या अभियानात केली जात आहेत. जळगाव परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे निर्देश कार्यकारी संचालक मिश्रा यांनी यावेळी दिले.
दरम्यान, कार्यकारी संचालक मिश्रा यांनी मंगळवारी धुळे जिल्ह्यातील बोरिस व मुकटी येथील 33 केव्ही उपकेंद्रांना भेट देऊन पाहणी कामकाजाची केली. उपकेंद्रांतील उपकरणे सुस्थितीत ठेवा, कृषी ग्राहकांना ठरवून दिलेल्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRemain vigilant to ensure uninterrupted power supply during sensitive situations

Related Posts

जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026
गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक ; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडले

November 23, 2021

आता राज्य सरकारच्या शिफारशीनंतरच कुलगुरूंची नियुक्ती होणार, मंत्रिमंडळाची मंजुरी !

December 16, 2021

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026

मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना प्रशासनाने ठोठावला दंड !

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group