TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्रीजवळ रस्ता लुट करणारी टोळी अवघ्या काही तासात जेरबंद ; धरणगाव पोलिसांची कामगिरी !

सापळा रचून चौघांना अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी ; मौजमस्तीसाठी करायचे जबरी चोरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्रीजवळ धुमाकूळ घालणाऱ्या रस्ता लुटारूंच्या टोळीला अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात धरणगाव पोलिसांनी यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे चौघांना सापळा रचून पोलिसांनी शिताफीने अटक केली. सुनील अशोक कुऱ्हाडे (वय १९ रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), गोपाल संजय कुऱ्हाडे (वय २२,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), गणेश संजय कुऱ्हाडे (वय २०,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), कृष्णा अनिल (वय १९,रा.पिंप्री खुर्द ता. धरणगाव), असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नेमकी काय होती घटना
रस्त्यात अडवून वेगवेगळ्या घटनेत दोघांना मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना पिंप्रीजवळ घडल्या होत्या. पहिली घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विनोद शिवाजी पवार (रा. पढावद ता. शिंदखेडा) यांच्यासोबत घडली. अज्ञात तीन ते चार लोकांनी त्यांना वाघळूद बु. गांवाकडे जाणाऱ्या रोडवर, पिंप्रीखुर्द गांवाचे बाहेरील साईनगरी जवळ अडवले. यानंतर विनोद पाटील यांना जमिनीवर खाली पाडून त्यांच्या खिशातील मोबाईल,ब्लू ट्युथ आणि १५०० रुपये रोख, असा एकूण १६ हजार ५० रुपये किंमतीचा ऐवज जबरीने लुटून नेला होता. तर दुसऱ्या घटना अवघ्या अर्ध्या तासानंतर म्हणजे ११ वाजेच्या सुमारास घडली होती. संदीप सुरेश बोरसे (रा.सात्री ता. अमळनेर) यांना धरणगावकडे जाणाऱ्या नदीवरील पुलाजवळ तीन-चार अज्ञात इसमांनी येवून धक्काबुक्की करून माझ्या खिश्यातील ९ हजार ८०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरीने लुटून पोबारा केला. या प्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास पो.ना मोती पवार हे करीत होते.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

संशयितांना असे केले जेरबंद
एकाच रात्री रस्ता लुटीच्या दोन घटना घडल्यामुळे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. त्यानुसार त्यांना माहिती मिळाली की, पिंप्री गावात काही जणांनी जुना मोबाईल विकला आहे. त्यानुसार पो.नि. खताळ यांनी तपासधिकारी पोहेकॉ मोती पवार, पोहेकॉ राजेंद्र कोळी, उमेश पाटील यांच्या पथकाला पिंप्री गावाकडे रवाना केले. या पथकाने गुप्त माहिती काढत चौघांना सापळा रचून अटक केली. अवघ्या काही तासात रस्ता लुटारूंच्या टोळीला अटक केल्यामुळे धरणगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.

मौजमस्तीसाठी करायचे जबरी चोरी
पोलिसांनी सुनील कुऱ्हाडे, गोपाल कुऱ्हाडे, गणेश कुऱ्हाडे, कृष्णा राठोड यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील एक मोबाईल आणि ब्ल्यू ट्युथ जप्त केला आहे. चौकशीत फक्त मौजमस्तीसाठी आपण जबरी चोरी करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, अवघ्या विशीतील तरुण त्यातही दोन सख्खे भाऊ फक्त मौजमस्तीसाठी गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आल्यामुळे पोलीसही हैराण झालेत. या टोळीकडून अजून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

जळगावातील तरुणांचा मनसेत प्रवेश ; दुर्गेश पन्हाळे यांची विभाग अध्यक्षपदी नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे एसपी ऑफीसमधील लिपीक एसीबीच्या जाळ्यात

September 23, 2020

धक्कादायक : पुण्यात २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

November 8, 2021

शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर कर्जाची रक्कम वर्ग ; खा. उन्मेष पाटील यांची महसूलमंत्र्यांकडे तक्रार !

September 8, 2022

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखांची बॅग चोरी !

February 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group