TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा ; आ. एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, पक्ष बांधणी मजबूत करायची असेल तर कार्यकर्ता निष्ठावान आणि प्रामाणिक असला पाहिजे, पक्षाची ध्येय धोरणे त्याला माहिती असली पाहिजेत, त्याने ग्राउंड लेव्हलला काम केले पाहिजे, गावा गावातील परिवाराशी त्याचे सौहार्दाचे नाते असले पाहिजे, सुखदुःखाच्या वेळी तो मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला पाहिजे. कार्यकर्ता घडण्यासाठी असे अभ्यास वर्ग अतिशय महत्त्वाचे असतात, यातून कार्यकर्ता घडतो, शिबिरात मिळालेली ही शिदोरी गावातील बुथरचना मजबूत करण्यासाठी वापरा,” वन बूथ थर्टी युथ ” याप्रमाणे बुथ रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशीय निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नंदुरबारचे माजी आमदार पाडवी साहेब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई,माजी आमदार अरुण दादा पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी ताई खडसे, शिबिर प्रमुख यू.डी पाटील सर, प्रा. सुरेश पांडे सर, दीपक पाटील, आबा पाटील, किशोर पाटील, विलास धायडे, निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावेळी बोलताना आ. एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्ता घडण्यासाठी शिबिर अर्थात अभ्यास वर्ग कसा महत्त्वाचा असतो हे स्पष्ट करून सांगितले. शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थींचे भाऊंनी अभिनंदन केले. याआधी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई यांनी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठणे गरजेचे असल्याचे सांगितले. महागाई बेरोजगारी हे प्रश्न प्रामुख्याने जनतेसमोर मांडण्याची त्यांनी आव्हान केले. यावेळी माजी आ. पाडवी यांनी शिबिरामध्ये राबवलेल्या विविध उपक्रमाविषयी आयोजकांच्या अभिनंदन केले.

समारोपीय भाषणामध्ये ह्या अॅड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पक्षाचे ध्येय धोरणांसह देशातील ज्वलंत प्रश्न जसे बेरोजगारी, महागाई जनतेसमोर पोहोचवा. देशात सुरू असलेली लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी पुढे या. सध्याचे सरकार हे मूठभर लोकांसाठी काम करीत असल्याची संत त्यांनी व्यक्त केली. शेतीमालाला भाव नाही, कापूस सोयाबीन, शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत, सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही… अशा या दळभद्री सरकारला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले.

याआधी अॅड. रोहिणी ताई खडसे यांनी दोन दिवसीय शिबिरासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून बूथ प्रमुखांनी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.चालू वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून आतापासूनच कामाला लागा, पक्ष संघटन मजबूत करा येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय राष्ट्रवादीचाच असेल,असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. सुनील नेवे सर यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. शिबिरात प्रा. सुरेश पांडे, प्रा. जतीन मेढे यांची प्रभावी व्याख्याने कार्यकर्त्यांना भुरळ पाडून गेली. तसेच आज निमखेड येथील युवराज सुभाष पाटील यांच्या मनोगताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. रात्री टिकटिक वन मिनिट, मामाचं पत्र हरवलं, शेलापागोटे या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी मनमुराद आनंद लुटला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

आपदग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : शाळकरी मुलगी बलात्कारानंतर गरोदर ; तरुणासह मुख्याध्यापक, वॉर्डनलाही अटक !

January 20, 2022

फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन !

December 8, 2023

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दोन जणांना अटक

March 21, 2021

सावधान ! भारतात कोविशिल्डच्या बनावट लसी सापडल्या ; WHO नं दिला सतर्कतेचा इशारा

August 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group