TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभाविप एरंडोलच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एरंडोलच्या माध्यमातून पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी आज बंद आहे. मागील काही वर्षापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्य सरकार कर्मचारी म्हणून सामावून घेण्याचा व अशा विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत, या संदर्भात अनेक वेळी राज्यात आंदोलने देखील झाली आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्य शासनाकडून दिले गेले, परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आंदोलन झालेली आहेत. या आंदोलनादरम्यान ३७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल देखील उचलले आहेत. कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेला कामबंद आंदोलन प्रसंगी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. परंतु योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे आता पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे.

READ ALSO

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीसंदर्भात गैरसोय होत आहे. ११ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करतात, अनेक वाडी-वस्ती व गावात प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे, योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे मागणी पत्रक अभाविपने राज्यपाल, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले.

यावेळी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देत योग्य तो तोडगा काढावा. अभाविप महाराष्ट्र प्रदेश व जळगाव जिल्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या मागण्यांत सोबत आहे आणि वेळ पडल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आंदोलन देखील करतील.

यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, शहरमंत्री रितेश ठाकरे, आनंद महाजन, भावेश जगताप, प्रथमेश कासार, नितेश चौधरी, चेतन पाटील, वरद विसमुते, निरज पाटील, योगेश चौधरी, यश जगताप, ईश्वर भोई, महेश पाटील, भुषण पाटील, भावेश लोहार, कल्पेश वानखेडे व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
Next Post

न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे धोकादायक : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव तालुका हादरला ; बिलवाडीतील रखवालदाराचा खून करीत ट्रॅक्टर लांबवले !

November 15, 2023

सौ. जयश्रीताई महाजन उद्या धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

October 28, 2024

बापरे ! एड्स असताना देखील काकीने अल्पवयीन पुतण्यासोबत ठेवले शारीरिक संबंध

April 5, 2022

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा : अनिकेत पाटील

September 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group