धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसीलदार नितीनकुमार देवरे हे स्वतः ईपीक पाहणी अँपची जनजागृती करत आहेत. त्यांनी आज चिंचपुरा येथील पिक पाहणी बाबत माहिती व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन दिले.
याप्रसंगी सरपंच चिंचपुर बुद्रुक कैलास पाटील, विजय पाटील मंडळ अधिकारी एस आर बोरसे, तलाठी राहुल ढेरंगे, वाहनचालक मनोज पाटील, असलम पटेल, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सदर ॲपद्वारे १५ सप्टेंबरपर्यंत पिक पाहणी शेतकरी बांधव स्वतः करू शकतील, अशी माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून याबाबत माहितीही देण्यात आली.