मुक्ताईनगर (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिंचखेडा येथील गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिवाकर वसंत निकम (30, चिंचखेडा बु.॥) यांच्या फिर्यादीनुसार, वसंत रावजी निकम (65) हे रविवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजता वायला फाट्याकडून गावाकडे गुरे-ढोरे आणत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. तपास पोलिस नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.