TheClearNews.Com
Monday, April 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तिरंग्याचा अपमान करणाऱ्या आरोपींना सरकार अटक करत नाही ; संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) “ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे. पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केली जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे”.

देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलेलं असून संसदेत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये वादळी चर्चा सुरु आहे. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बुधवारपासून चर्चा सुरु करण्यात आलेली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करत आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्रावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते देशासाठी योग्य नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचं सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. राउत पुढे म्हणाले, ‘संसदेतील आमचे सहकारी संजय सिंह यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. राजदीप सरदेसाई नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. सिंघु बॉर्डरवर रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि लेखकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो.’‘देशातील कायद्यातून IPC च्या सर्व कलमा संपवल्यात,असे वाटत आहे. आत फक्त देशद्रोहाची कलम लावली जाते. आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा आदर करतो आणि पुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे, पण बहुमत अहंकाराने नाही, तर सर्वसम्मतीने चालते.’

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक भाषण करणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखांचं रोख बक्षिस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी ५०,००० रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

दीप सिद्धू पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली आहे. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार काउन्सिलचा सदस्यही राहिला आहे. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. महत्त्वाचं म्हणजे भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

माझी वसुंधरा अभियानांतर्गत फैजपूर शहरात वृक्षारोपण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल नगर येथील नागरिकांना अन्नधान्य वाटप

September 13, 2020

घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून केले वार

September 17, 2025

गुलाबराव पाटील यांच्याकडेच जळगाव जिल्ह्याची धुरा कायम

January 18, 2025

जामनेरच्या ‘त्या’ भूखंडाच्या चौकशीसाठी शासनाकडून पुन्हा समिती गठीत !

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group