TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ : शिवसेना

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन आता शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे, असं शिवसेनेनं सामान अग्रलेखात म्हटलं आहे.

स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातच एसीबीनं धाड टाकल्यावरून शिवसेनेनं भाजपावर परखड टीका केली आहे. “बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे त्यामुळे नाकच कापले गेले”, असं या अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दरम्यान, पिंपरी चिंचवड पालिकेत घडलेल्या प्रकारामुळे शहराची ‘इज्जत’ गेल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. “भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे. या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे कधीच वावडे नव्हते. हेच लोक ऊठसूट मुंबई पालिकेवर निशाणा साधीत असतात. पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळतंय त्याचा मात्र त्यांना विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय, ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडले”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“सगळ्यांच्या डोळ्यांदेखत स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या एजंटला लाच स्वीकारताना पकडले याला भाजपावाल्यांनी षडयंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखं आहे. इतरांनी असे पैसे घेतले तर तो भ्रष्टाचार आणि स्वत:चे बरबटलेले हात पोलिसांच्या बेड्यांत अडकले, तर तो मात्र षडयंत्राचा प्रकार! पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमधील विद्यमान कारभाराविषयी सांगण्यासारखे खूप आहे. पण या महान शहरांची इज्जत जाईल, म्हणून पूर्णविराम देतो”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस, नेमकं काय आहे कारण ?

November 16, 2021

स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

June 3, 2021

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !

July 28, 2023

भांडी पॉलिश करायला देण्याआधी सावधान ; जळगावातील महिलेचे दागिने लंपास

January 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group