धरणगाव- लोकसहभागातून जि प मराठी शाळा अनोरेचा कायापालट मराठी शाळा विकास मंचच्या सहकार्याने जि प मराठी शाळा अनोरे येथे मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह अंदाजे 5लाखांचं अत्याधुनिक पद्धतीने बांधन्यात आले त्याचे उदघाटन विकास मंचचे अध्यक्ष मिलिंद भालचंद्र पाटील व मीना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विकास मंचचे उपाध्यक्ष अनोरे गावचे सरपंच स्वप्निल महाजन ,ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विकास मंचचे माजी अध्यक्ष संतोष चौधरी व पदाधिकारी उपस्थितीत होते.
शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष माधुरी महाजन व पदाधिकारी, गावातील बंधुभागिनी उपस्थित होते
या कामाला माजी मुख्याध्यापक रमेश गुरुजी अनमोल सहकार्य लाभले
कामपूर्ण करण्यासाठी मुख्याध्यपिका सुमन रमेश महाजन, उपशिक्षक सुनिल पाटील, मनोहर पाटील ,दिनेश पाटील, दिनेश वाडीले सहकार्य लाभले.