TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उद्धव ठाकरे यांचा फक्त शिव्या देणे हाच अजेंडा : देवेंद्र फडणवीस !

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2024
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही तर दिल्लीची आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही. फक्त शिव्या देणे हाच त्यांचा अजेंडा आहे. नेता, नीती व नियातही नसलेले ही महा आघाडी आहे, असा जोरदार घणाघात महायुतीच्या उमेदवार स्मिता ताई वाघ यांच्या प्रचारासाठी पाचोरा येथील गर्जना सभेत देवेंद्रजी फडणवीस यांनी केला. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून सभेला सुरवात झाली. सभेचे प्रास्ताविक पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. त्यात त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघ हा महायुतीचा मतदारसंघ आहे. भडगाव पाचोरा मतदार संघातून आम्ही एक लाखापर्यंत मताधिक्य देवू अशी हमी दिली.

मोदीजींचे हात बळकट करा
महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देश जर संरक्षित हातात द्यायचा असेल तर तर मोदिजींचे हात बळकट करा. देशाच्या अर्थव्यवस्थेला टॉप 05 मध्ये नेण्यासाठी मोदिजीना मतदान करा. मी आज उभी नाही तर मोदिजी उभे आहेत. एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे यावेळी पहिले मतदान कर्त्यव्य माझ्या भगिनी पूर्ण करतील मग आखाजीला गावी जातील, असा विश्वास व्यक्त केला.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

ऐतिहासीक विजयाचे साक्षीदार व्हा
मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार आपण भाजपा महायुतीचे कराल व 400 पारच्या ऐतिहासिक विजयाचे आपण साथीदार व साक्षीदार असाल असा विश्वास व्यक्त केला.

दहा वर्षात सर्वांगीण विकास : मंत्री गिरीश महाजन
संकट मोचक, मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी आपणच आपला लीड तोडण्यासाठी प्रयत्न करत आहात. 10 वर्षात सर्वांगीण विकास झालेला आहे. रस्ते, रेल्वे, विमानसेवा दुपटी तिपटीने पुढे जात आहेत. मोदिजींचा करिष्मा सर्व जगात आहे. संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रे आपण आपल्या देशातच बनवत आहोत. देश वेगाने पुढे जात आहे तो फक्त मोदी साहेबांमुळे त्यामुळे जनतेने ठरवले आहे. यावेळी मोदिजींना 400 पारचा पूर्ण करून द्यायचा आहे.

 

महायुती म्हणजे विकासाची ट्रेन
ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही तर दिल्लीची आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही. फक्त शिव्या देणे हाच त्यांचा अजेंडा आहे. नेता, नीती व नियातही नसलेली महाआघाडी आहे. स्मिताताई यांनी जिल्ह्यात प्रचंड काम केलेले आहे त्यामुळे आपण स्मिताताईच्या पाठीशी उभे राहाल. कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील याचा फैसला करणारी हि निवडणूक आहे. आपल्या समोर दोनच पर्याय आहेत. एक जगाला गौरव वाटणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. त्यांच्याकडे 24 पक्षाची खिचडी आहे. महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे व मोदिजी त्याचे इंजिन आहेत. सर्वांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसायला जागा आहे. 10 वर्षात 25 कोटी कुटुंबाना गरिबी रेषेतून बाहेर काढले, 20 कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्के घर दिले, 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय दिले, 60 कोटी लोकांच्या घरी शुध्द पिण्याचे पाणी आणले. आयुष्यमान भारत योजनेत पाच लाखांचा ईलाज मोफत केला. 80 कोटी लोकाना मोफत रेशन देत आहेत. हा सर्व विकासाचा रथ मोदिजी ओढत आहेत. आपण या रथाला हातभार लावाल, असा विश्वास आहे असे मत देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
गर्जना मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, अनिल पाटील, महायुतीच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार चिमणआबा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, दिलीप वाघ, माजी खासदार ए.टी.पाटील, डॉ.विकास महात्मे तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपाई, रासप, एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#electionloksbhaPachora

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

तर उन्मेष पाटील यांना आता त्यांच्यात भाषेत उत्तर दिले जाईल : चंदन पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सलमान खानसह वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2022

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू !

June 9, 2024

औरंगाबाद हादरलं ! निर्जनस्थळी कारमध्ये स्फोट ; जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेत आढळले मृतदेह

February 17, 2022

दरोडेखोरांची टोळी एलसीबीच्या जाळ्यात ; मुक्ताईनगरच्या सराफा व्यावसायिकाला लुटून केला होता पोबारा !

December 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group