जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्यात यावे यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात यावे अशी मागणी, आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 राज्यस्तर बैठक आज दृक्श्राव्य माध्यमातून (ऑनलाईन) पार पडली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सदर बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao pati ) यांच्यासोबत सहभागी झालो. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वाढते शहरीकरणामुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या बघता नगरोत्थान योजनेसाठी जास्तीत जास्त तरतूद करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्यात यावे यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात यावे अशी विनंती यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. त्यावर दोघांनी सकारात्मकता दर्शवली.