मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रात्री माझ्याशी संपर्क साधून, त्यांना शिंदे गटात सहभागी होण्याबाबतचा सल्ला दिल्याची माहिती स्वत: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
गुलाबराव पाटील हे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईलाच थांबून होते. मात्र, शिवसेनेकडून शिंदेचे बंड रोखण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रात्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शिंदे गटात सहभागी होण्याचा सल्ला दिला. स्वत: गुलाबराव पाटील यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे. तसेच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. परंतू यानिमित्ताने भाजपाचा शिवसेना फोडण्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होत आहे.