नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांनी आज धरोहर मालिकेचा ११ भाग शेअर केला आहे.
काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत हल्लाबोल करत आहे. राहुल गांधी यांनी धरोहर मालिकेचा ११ भाग शेअर केला आहे. तसंच तो भाग शेअर करत “स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही,” असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी त्यापूर्वी कृषी विधेयकावरून सरकारवर निशाणा साधत ट्विट केले होते. मोदीजींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं. पण मोदी सरकारच्या काळ्या कायदे शेतकरी आणि शेतमजूरांचे आर्थिक शोषण करण्यासाठी केले जात आहेत. हे जमीनदारीचं नवं स्वरूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली, अशी टीका राहुल गांधी यांनी गुरूवारी केली होती. विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी यावर भाष्य केले होते.