TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या वीजयंत्रणेमधील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली किंवा मीटर काढणे यासारखी कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करण्याची पूर्णतः जबाबदारी तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहेत. अशी तांत्रिक व जोखमीची कामे करवून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये. असे प्रकार आढळून आल्यास व विद्युत अपघात झाल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध बडतर्फीसारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी नुकतेच परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना याबाबत खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे हे प्रत्येक संबंधित अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. वीज यंत्रणेमध्ये प्रत्यक्ष कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गामध्ये प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांवर नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीमधील बिघाड शोधणे, वीज पुरवठ्याच्या ग्राहक तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसूली करणे आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे यासारख्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
तथापि, महावितरणचे काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः करण्याऐवजी खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे. याबाबतच्या तक्रारी मुख्यालयस्तरावर प्राप्त झाल्या आहेत. महावितरणच्या वीजयंत्रणेतील कामांसाठी खासगी व अनधिकृत व्यक्तींचा वापर करणे अत्यंत गंभीर बाब आहे. अशा अनधिकृत व्यक्तींकडे पुरेसे तांत्रिक ज्ञान व सुरक्षेचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे विद्युत व यांत्रिक अपघात घडून संबंधित खासगी व्यक्ती तसेच कर्मचाऱ्यांचा अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय वीज ग्राहक व महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागते.
‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स २०२३’ मधील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तीच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करू शकते किंवा विद्युत वाहिन्या व उपकरणांवर काम करण्यास पात्र असते. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीस वीज यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचे काम करण्यास परवानगी देणे अथवा त्याच्याकडून काम करून घेणे हे पूर्णपणे बेकायदेशीर व अनधिकृत कृत्य आहे. तसेच महावितरणच्या सेवाविनियमांनुसार ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीत मोडते.
या सर्व गंभीर बाबींची दखल घेत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी एका परिपत्रकाद्वारे कठोर निर्देश जारी केले आहेत. अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून काम केल्याचे किंवा अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमुळे कोणतीही दुर्घटना, अपघात किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी असे निर्देश संचालक श्री. औंढेकर यांनी दिले आहेत. चौकशीअंती दोषी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सेवाविनियमातील तरतुदींनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्ती यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. यासोबतच क्षेत्रिय कार्यालयातील मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाच्या कामांमध्ये कुठल्याही परिस्थितीत खासगी व अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही याची वेळोवेळी खातरजमा करावी असे आदेशही संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAction such as immediate dismissal will be taken if work on Mahavitaran's electricity infrastructure is carried out by private individuals.

Related Posts

गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
Next Post

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाऊसो गुलाबराव फौंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात पालक विद्यार्थी भारावले !

July 21, 2024

त्या रेल्वेने आईचा मृतदेह कसा नेवू? ; रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यासाठी मुलाची भावनिक विनवणी

January 24, 2025

चोपडा नगरपरिषदचे मागण्या मान्य करत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचे ठिय्या आंदोलन……

December 9, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 11 नोव्हेंबर २०२४ !

November 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group