जळगाव (प्रतिनिधी) नेपाळाहून मुंबईला जात असलेल्या कमला भंडारी यांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने कुटुंबियांना सांगितले की, यांचा मृतदेह रेल्वेमधूनच नेला जावा. परंतु, कमला भंडारी यांचा मुलगा तपेंद्र भंडारी यांनी त्या रेल्वेनेच त्यांच्या आईचा जीव घेतला असल्याने, ते गहिऱ्या वेदनेने प्रशासनास सांगू लागले, “ज्या रेल्वेने माझ्या आईचा मृत्यू घेतला, त्या रेल्वेने मी तिचा मृतदेह कसा नेवू?” यावर प्रशासनाने त्यांना रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
या अपघातात मृत्यू पावलेले व्यक्ती उत्तरप्रदेश आणि नेपाळ येथील रहिवासी आहेत. पोलीसांनी मृतदेहांची ओळख पटविल्यानंतर दुपारपर्यंत शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. त्यानंतर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयात मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि मृतदेह त्यांच्या गावापर्यंत पोचवण्याचे निर्देश दिले.
परंतु, मृतदेह नेण्याची वेळ आल्यावर प्रशासनाने काही अडचणी सांगितल्याने कुटुंबीयांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. अखेर, दोन मृतदेह, कमला भंडारी आणि लच्छी राम पासी यांचे शव नेपाळला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली. त्या वेळी, नातेवाईक सायंकाळी उशिरा नेपाळकडे रवाना झाले.
मृतदेह रेल्वेने नेण्यास नकार
रेल्वे अपघातात मयत झालेल्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावापर्यंत नेण्याची जबाबदारी रेल्वे प्रशसानाने स्विकारली होती. परंतु मयताच्या नातेवाईकांनी रेल्वे मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशसानाकडून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मयताचे कुटुंबिय शुक्रवारी सायंकाळपर्यंत मृतदेह घेवून आपल्या गावाकडे रवाना झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी करून दिली उपलब्ध रुग्णवाहिका
मृतदेह नेपाळला नेण्याच्या कारणावरुन जिल्हा प्रशासन आणि मयताच नातेवाईकांमध्ये एकमत होत नव्हते. प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना नियमांची सरबत्ती केली जात होती. मात्र नातेवाईक आपल्या भूमीकेवर ठाम असल्याने माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्यात मध्यस्ती केली. मयताच्या नातेवाईकांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत फोनवरुन बोलणे करुन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मयताच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत त्यांच्यातील माणूकीचे दर्शन घडविले.
प्रांताधिकाऱ्यांची भूमिका आडमुठी
जिल्हा प्रशासनाने सकाळी मृतदेह मयतांच्या गावापर्यंत घेवून जाण्यासाठी त्यांना रुग्णवाहिका देण्यास संमती दिली. मात्र जिल्हा प्रशासच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांनी मृतदेह रेल्वेतूनच घेवून जावा लागेल अशी भूमीका घेतली. मृतदेह नेण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील आणि तुम्हाला तसे लेखी लिहून द्यावे लागेल. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावे लागेले असे प्रांतधिकारी यांनी मयताच्या नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी मयत भंडारी यांचा मुलगा तपेंद्र याच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहीकेतून घेवून जावू, आम्हाला त्यांनी आतापर्यंत खूप सहकार्य केले, परंतु ज्या रेल्वेने माझ्या आईचा जीव घेतला, त्या रेल्वेने मी तीचा मृतदेह घेवून जाणार नाही. जो पर्यंत प्रशासनाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार नाही, तो पर्यंत मृतदेह घेवून जाणार नसल्याची भूमीका त्यांनी घेतली होती.