TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंचोली-पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र (MIDC) उभारण्यास मान्यता : उद्योग मंत्री सामंतांची घोषणा !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील याचा पाठपुरावा ; लवकरच निघणार शासन निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र (MIDC) उभारण्यास मान्यता मिळावी यासाठी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यात जळगाव येथे जळगाव एम. आय. डी. सी. चा वाढता विस्तार पाहता जळगाव तालुक्यात चिंचोली – पिंपळे व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून याबाबत मंत्रालय स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. दरम्यान, यासोबत जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला उभारी देणारे महत्वाचे विषय देखील या बैठकीत मार्गी लागले आहेत. याबाबत ना.गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या मान्यतेमुळे चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र (MIDC) उभारण्यास व रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय निघणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

या संदर्भात माहितीशी की , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या आढावा बैठक व जळगाव उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांनी जळगाव औद्योगिक क्षेत्रा लागत नवीन जागा भूसंपादनाची मागणी करून तालुक्यात चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. जळगाव औद्योगिक क्षेत्रात लगत प्रस्तावित अतिरिक्त जळगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ स्थापन करणे बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडील आढावा बैठकीत नुसार कुसुंबे खुर्द व चिंचोली येथील प्रस्तावित क्षेत्राची प्रादेशिक अधिकारी , उप रचनाकार , उप अभियंता जळगाव व भूमापक यांचे मार्फत प्राथमिक स्थळ पाहणी करून व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार व उद्योगमंत्री यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ चे प्रादेशिक अधिकारी धुळे यांनी महाव्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुख्यालय मुंबई यांना मौजे कुसुंबे खुर्द चिंचोली येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणे बाबत प्रस्ताव सादर केलेला होता. यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

रोजगार निर्मितीसाठी होणार एमआयडीसी ! – पालकमंत्री

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात रोजगार निर्मीतीसाठी औद्योगीक विकास होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने उद्योजकांच्या सर्व समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याला आपले प्राधान्य राहणार असून रोजगार निर्मितीसाठी आपण सातत्याने उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

तुळजापूरला दर्शनासाठी चाललेल्‍या भाविकांच्या गाडीचा अपघात ; तीन महिलांसह चालक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळा, मंदिरं टप्प्याटप्यात उघडणार : राजेश टोपे

October 10, 2020

ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् ७ कोरोना रुग्णांना झाला मृत्यू !

May 10, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2025 !

October 3, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार १७ ते २३ जुलै २०२२ !

July 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group