TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी हे तर खरे कल्पवृक्ष – अशोक जैन

पोस्टाच्या पाकिटावर आता जळगावच्या केळीचे चित्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2022
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) केळी हेच तर खरे कल्पवृक्ष आहे. जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात असणे अत्यंत गौरवाची बाब आहे. जळगावची केळी, नवतंत्रज्ञान, टिश्युकल्चरची केळी भारतात आणि भारता बाहेर प्रसिद्ध पावलेली आहे. याचे सगळे श्रेय जळगावच्या केळी उत्पादक भूमिपुत्रांना जाते. केळी उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले व ते तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून दिले त्यामुळे आज जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्याने पिकविलेली केळी जीआय मानांकन मिळवून विश्वाच्या पटलावर आलेली आहे. येथील केळी उत्पादकांना याचे श्रेय द्यायला हवे म्हणूनच आपण डाक विभागाबरोबर पाठपुरावा करत केळीचे चित्र व माहिती असलेले पाकिट (इनव्हलप) आज प्रकाशित करीत आहोत, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

विश्व टपाल दिनाचे औचित्य साधून जळगाव डाक विभागाने अशोकभाऊ जैन यांच्याहस्ते जळगाव केळी यावरील विशेष पोस्टाच्या पाकीटाचे प्रकाशन गांधी उद्यानात सकाळी करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी ऑल इंडिया बनाना ग्रोवर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन, जळगाव डाक विभागाचे अधीक्षक बी.व्ही. चव्हाण, निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्र, तांदलवाडीचे अध्यक्ष शशांक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

केळीला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी, केळीला जीआय मानांकन मिळविण्यात शशांक पाटील यांचे प्रयत्न व जैन टिश्युकल्चरच्या गुणवत्तापुर्ण केळीची मिळालेली जोड आणि त्यास कृषि विभागाचेही मिळालेले सौजन्य या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत जळगाव जिल्ह्याची स्वतंत्र ओळख असलेल्या केळीला पोस्टाच्या पाकिटावर स्थान मिळाले याचा आनंद अशोकभाऊंनी व्यक्त केला.

ऑल इंडिया बनाना ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी केळीमध्ये टिश्युकल्चर तंत्रज्ञान आणून केळीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा टपाल खात्याचा अगदी जवळचा संबंध आहे हे स्पष्ट करताना महाजन म्हणाले की, यावल, रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पोष्टाच्या अल्पबचत दामदुप्पट योजनेची आठवण काढली. केळी उत्पादक पोस्टाच्या दामदुप्पट योजनेत आपले पैसे गुंतवणूक करीत असत व जळगाव जिल्ह्याचा महाराष्ट्रात बचत करण्यात पहिला नंबर लागत असे. त्या पोस्टाच्या पाकीटावर केळीचे चित्र व केळी तंत्रज्ञानाची माहिती प्रकाशित होणे हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव असल्याचे त्यांनी सांगून केळी फळाचे महत्त्व सांगितले. दररोज एक केळी खा व चिरतरुण रहा असा मोलाचा सल्ला देखील महाजन यांनी दिला.

ज्यांनी केळीचे जीआय (जिऑग्राफिकल इंडेक्स) मानांकन केले असे तांदळवाडी निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्राचे अध्यक्ष शशांक पाटील यांनी आधी स्वतःची ओळख सांगून मानांकन मिळविण्यासाठी काय करावे लागले ते सविस्तर सांगितले. दिल्लीला जीआय मानांकनासाठी केळीचे सादरीकरण करण्यासाठी आम्ही 50 किलोचा केळीचा घड रेल्वेने तेथे नेला. पाहणारे सारे आश्चर्यचकीत होऊन आमच्याकडे पाहात होते. तेथे 13 शास्त्रज्ञांसमोर हे सादरीकरण करतांना त्यांनी ही जैनची टिश्युकल्चर केळी आहे का अशी विचारणा केली, एवढी तिची ओळख तेथपर्यंत पोहचली होती. याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे तिथे द्राक्षाचे जीआय मानांकन झाले. जळगाव व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातही केळी पिकविली जाते, त्या केळी इतर ठिकाणच्या केळीच्या तुलनेत रंग, रुप, चव आदीमधे फरक आहे. त्यामुळे ती जगभर प्रसिद्ध आहे म्हणून केळीसाठी जळगावला मानांकन घेणे गरजेचे होते. आपल्या जिल्ह्याची केळी व त्यामुळे बदललेले अर्थकारण याबाबत देखील आपल्या भाषणात त्यांनी प्रकाशझोत टाकला. चप्पल बुट हे एसीच्या दुकानात विकले जातात व केळी मात्र ठेल्यावर, उघड्यावर विकली जाते हे शल्य देखील पाटील यांनी बोलून दाखविले. यावेळी जळगाव डाक विभागाचे अधीक्षक श्री. बी. व्ही. चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

हे जळगाव केळी वरील विशेष इनव्हलप गांधी रिसर्च फाऊंडेशनने जैन टिश्युकल्चर यांच्या मदतीने तयार केले आहे. याच्या 4000 प्रति करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या जनसामान्यांसाठी गांधी तीर्थ आणि जळगावच्या टपाल कार्यालयात उपलब्ध होतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आश्विन झाला यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

शिरसोलीच्या भाविकाचा केदारनाथ यात्रेत मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जी. एस. हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025

तिळवण तेली समाज सभागृहासाठी पालकमंत्र्यांनी दिला २६ लाखाचा निधी !

October 1, 2024

जळगाव हनी ट्रॅप प्रकरण : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटच्या दृष्टीने पोलीस तपासाची गरज !

October 21, 2020

संतापजनक ! शस्त्रांचा धाक दाखवत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group