TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

३० हजारांची केली मागणी

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात अटक टाळून चॅप्टर केस करण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून अखेर २० हजार रुपयांत तडजोड झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे तसेच त्यांचा खासगी पंटर सलीम कुरेशी (रा. बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील एका व्यक्तीविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबंधित प्रकरणात अटक टाळून केवळ चॅप्टर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर चर्चेनंतर अखेर २० हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे समोर आले आहे. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी थेट जळगाव एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

तक्रार प्राप्त होताच एसीबीने संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पडताळणी सुरू केली. प्राथमिक चौकशीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट होताच एसीबीच्या पथकाने सापळा रचला. एप्रिल २०२६ मध्ये तक्रारदाराला ठरल्याप्रमाणे रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र, शेवटच्या क्षणी उपनिरीक्षक व त्यांच्या पंटराला संशय आल्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यात आली नाही. तरीदेखील एसीबीने केलेल्या ध्वनिमुद्रण, संभाषण पडताळणी व इतर तांत्रिक तपासात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तपासाचा अंतिम अहवाल शुक्रवारी प्राप्त होताच जळगाव एसीबीचे पथक तातडीने भुसावळात दाखल झाले. या कारवाईत खासगी पंटर सलीम कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे उपनिरीक्षक राजू सांगळे हे सध्या आजारपणाच्या रजेवर असल्याचे सांगितले जात असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस विभागातील अंतर्गत कार्यपद्धती, खासगी पंटरांचा वाढता हस्तक्षेप आणि काही अधिकाऱ्यांचे कथित आर्थिक व्यवहार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

ही धडक कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, निरीक्षक रेश्मा अवतारे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाजारपेठ पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या कारवाईमुळे भुसावळ शहरात मोठी चर्चा रंगली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, सट्टा-मटका, अवैध धंदे तसेच गुन्हेगारीवर प्रभावी कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. काही सामाजिक संघटनांनी देखील पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उघडपणे टीका केली होती. अशातच आता लाचखोरीच्या या गंभीर प्रकरणामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्याची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalBhusawal Bazarpet Police Station PSI booked for bribery

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहारचे शिक्षणमंत्री चौधरींचा मंत्रिपद स्वीकारताच काही वेळातच राजीनामा

November 20, 2020

Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २४ फेब्रुवारी २०२३ !

February 24, 2023

महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्रात अडकुन अपघात ; तरुण विवाहितेचा मृत्यू !

May 16, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 जून 2025 !

June 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group