TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : ‘मविप्र’मधील 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील, साळुंखेंविरुद्ध गुन्हा दाखल !

राजकीय दबावामुळे आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा : अ‍ॅड. विजय पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2023
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सन 1998 ते 2002 या कालावधीत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक, चेअरमन पदावर नसताना देखील खोटे शिक्के, प्रोसेडींग बुक तयार करून लाखोंचा अपहार केला, अशा आशयाची फिर्याद नीलेश भोईटे यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हटलंय फिर्यादीत ?
मविप्र संस्था त्या काळात तानाजी भोईटे यांच्या ताब्यात होती. यावेळी अ‍ॅड. पाटील व साळुंखे यांनी संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र, शिक्के तयार केले. शहाजी त्र्यंबक साळुंखे यांना चेअरमनपदी दाखवले. २८ डिसेंबर १९९७ रोजी निवडणूकीसाठी सभा घेऊन खोटे प्रोसेडींग बुक तयार केले. या सभेत 22 संचालकांची निवड झाले, असे खोटे दस्ताऐवज तयार केले. त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वेळोवेळी पाठवलेले चेंज रिपोर्ट देखील फेटाळण्यात आले आहे. या माध्यमातून अ‍ॅड. पाटील व साळुंखे यांनी संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करुन लाखाे रुपयांचा अपहार केला आहे. असे निलेश भोईटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

विजय पाटील, हेमंतकुमार साळुंखे तसेच इतर तथाकथित म.वि.प्र.ह्या संस्थेशी कुठलाही कायदेशिर संबंध नसल्याने किंवा ते संस्थेचे निवडुण आलेले संचालक नाहीत हे माहिती असातांना देखील आरोपी ह्यांनी तत्कालीन कायद्याने निवडणूक आलेल्या संचालक मंडळाकडुन संस्थेच्या बेकायदेशिर ताबा घेण्याच्या हेतुने कट कारस्थान रचुन व संगनमताने सन 1998 ते 2002 ह्या कालावधीसाठी निवडणुक घेण्यात आली, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. सदरची खोटे शिक्के तयार करुन ते प्रोसेडिंग बुकावर मारलेले आहेत. संशयितांनी त्यांची कार्यकारणी वैध कार्यकारणी असून संस्था त्यांच्या ताब्यात आहे हे दाखविण्यासाठी खोटे किर्द, खतावणी, पावती पुस्तक व व्हाऊचर्स इत्यादी तयार केले.

सदरच्या खोट्या दस्तऐवजांच्या आधारे संस्थेच्या संदर्भात सन 1998 ते 2002 ह्या कालावधीसाठी चेंज रिपोर्ट क्र. 144/1998 हा सहायक धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्याकडे दाखल केला. परंतु सदरचा फेरफार अर्जासोबत दाखल केलेले दस्तऐवज व पुराव्यानिशी शाबित न करु शकल्याने आरोपी यांचा चेंज रिपोर्ट दिनांक 22 फेब्रुवारी 2002 रोजी फेटाळण्यात आला आहे. सदरच्या अर्जाकामी तत्कालिन संचालक यांनी खोटे व बनावट दस्तऐवज तयार केलेत. अशी घेतलेली हरकत देखील मे. कोर्टाने मान्य केली होती. सदरच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपिल मे. धर्मदाय सह आयुक्त नाशिक यांनी नामंजुर केलेले आहे. सदरच्या आदेशाविरुध्द् विजय पाटील, हेमंतकुमार साळुंखे तसेच इतरांनी जळगाव येथील मा. जिल्हा व सत्र न्यानायलयात दाखल केलेले दिवाणी अर्ज देखील मा. कोर्टाने नामंजुर केलेले आहेत. त्यामुळे सन 1998 ते 2002 या कालावधीसाठी निवडणुक घेण्यात आली व ते कायदेशीर संचालक आहेत. हे खोट्या दस्तऐवजांच्या आधारे करण्यात आले होते.

निवडणुकीसाठी सभा घेतल्याचे खोटे प्रोसेडिंग बुक तयार केले मुळात संशयित आरोपी हे संस्थेचे कायदेशीर संचालक नसल्याने त्यांचेकडे संस्थेचे मुळ प्रोसेडिंग बुक उपलब्ध नसतांना देखील खोटे प्रोसेडिंग बुक तयार करुन खोटा अजेंडा तयार करुन दिनांक 28 डिसेंबर 1997 रोजी खोट इतिवृत्त तयार करुन विजय पाटील यांनी स्वतःहाला मानद सचिव म्हणून निवडणूक आल्याबाबत घोषित केले. सदर खोटे दस्तऐवज तयार करण्यासाठी त्यांनी संस्थेचे खोटे प्रोसेडिंग बुक तयार करुन त्यात खोटे इतिवृत्त लिहीले. एवढेच नव्हे तर सदरच्या मिटींग मध्ये 22 संचालकांची निवड झाली असे देखील खोटे नमुद करुन खोटे दस्तऐवज तयार केले. खोट्या प्रोसेडिंग बुकावर इतिवृत्त लिहील्यानंतर त्यावर संस्थेचे असल्याचे भासवुन त्यांचा वापर संस्थेचा ताबा घेणेसाठी केलेला आहे. आरोपी यांनी बेकायदेशीर पणे खोट्या दस्तऐवजांच्या आधारे संस्थेतील कारभारामध्ये हस्तक्षेप करुन लाखो रुपयांचा अपहार केलेला आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहेत. दरम्यान,नीलेश भोईटे यांनी चार दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती. त्यानुसार आज पोलिसांनी भादवि कलम ४२०, ४६४,४६५,४६८,४७१,४७२,१२० ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय दबावामुळे आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा : अ‍ॅड. विजय पाटील

याच आशयाची फिर्याद सन २०१८ मध्ये पी. एस. पाटील यांनी दिली होती. तर निलेश भोईटे हे साक्षीदार होते. सन २०२१ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने तपासाअंती हा गुन्हा सी समरी’ म्हणून निकाली काढले होता. २५/२६ वर्षानंतर त्याच आशयाची शब्दनीशब्द सारखी असलेली फिर्याद पुन्हा देण्यात आलीय. अगदी कलमं देखील तीच लावण्यात आली आहेत. मंत्री गिरीष महाजन यांच्या दबावाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं म्हणजे पोलिसांनी असा खोटा गुन्हा कसा दाखल करून घेतला याचं मला आश्चर्य वाटतंय. पण संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार आहोत, खोट्या गुन्ह्यांना घाबरणार नाहीत, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. विजय पाटील​​​​​​​ यांनी दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

सत्तेसाठी नव्हेत तर हिंदुत्व वाचवण्यासाठी मार्ग बदलला : ना. गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर !

November 9, 2022

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना प्रयोगशाळेचा अणुजीव सहायकाला रंगेहात अटक !

August 30, 2023

चड्डी गँगचा कहर! रायसोनी नगरात तीन मंदिरांमध्ये चोरी, बंद घरही फोडले

August 5, 2025

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group