TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : नाशिकसह धुळे, नंदुरबारमधील आयकर विभागाच्या छाप्यात २४० कोटींची मालमत्ता जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात भ्रष्टाचार आणि करचोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहे. आता महाराष्ट्रात देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली (Income tax department raid at nashik, dhule and nandurbar) आहे. या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचं घबाड आयटीच्या हाती लागलं आहे. यामध्ये ६ कोटींच्या रोकडसह ५ कोटींचे मौल्यवान दागिने देखील जप्त करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रामध्ये मागील ५ दिवसामध्ये आयकर विभागाने तब्बल ३१ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आयकर विभागाने २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीमध्ये जप्त केलेले कोट्यवधींचे घबाड मोजण्यासाठी तब्बल १२ तास लागले आहेत. छाप्यामध्ये सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. छापेमारीमध्ये आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अशी केली कारवाई?

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये ३२ ठिकाणी जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले. बुधवारी, २२ डिसेंबर रोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई सुमारे पाच दिवस चालल्याचे समजते. मात्र, याची कुणकुणही कोणाला लागू देण्यात आली नाही. या कारवाईत एकूण २४० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. एकाचवेळी नंदुबारसह इतर ठिकाणच्या बिल्डरची कार्यालये, घरे, भागीदारांचे निवासस्थान, नातेवाईक यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले.

नाशिकमध्ये येथे छापे

नाशिकमध्ये शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत आयकर विभागाने छापे टाकले. या कॉलनीतील व्यावसायिकांची घरे आणि त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. विशेषतः देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही कित्येकांचे घबाड सापडल्याचे समजते. या संबंधित व्यावसायिकांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतक्या मध्यवस्तीत कारवाई होऊनही याचा थांगपत्ता कुणाला लागू देण्यात आला नाही.

१७५ अधिकारी, २२ गाड्यांचा ताफा

उत्तर महाराष्ट्रातील ही बडी कारवाई करण्यासाठी १७५ अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले. त्यांच्या दिमतीला एकूण २२ गाड्यांचा ताफा आणि तगडा पोलीस बंदोबस्त होता. या कामासाठी नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण येथील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. सर्वांची वेगवेगळी पथके तयार केली. काही जणांनी गुजरातमधून धुळेमार्गे तर काही जण नवापूरहून नंदुरबारमध्ये पोहचले. दुसरीकडे नाशिक, धुळ्यात अशा वेगवेगळ्या मार्गाहून हा ताफा पोहचला.

१२ तास मोजदाद

आयकर विभागाच्या पथकाला यावेळी अनेक धक्कादायक बाबी समजल्या. अनेक व्यावसायिकांनी तब्बल २५ कोटींचे व्यवहार रोखीत केल्याचे समोर आले. यावेळी तब्बल ६ कोटींची रोकड आणि ५ कोटींचे मौल्यवान दागिने सापडले. या अफाट मायेची मोजदाद करायला पथकाला जवळपास १२ तास लागले. पैसे मोजता मोजता मशीन थकल्या आणि दागिने मोजता मोजता हात दुखू लागले, अशी अवस्था यावेळी होती. अजय देवणगणचा रेड सिनेमा अनेकांना आठवत असेल. अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी होती.

मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे

आयकर विभागाला यावेळी पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात अतिशय मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे, मोत्याची दागिने अशी मोठी जडजवाहिरे सापडली. अनेकांनी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळले. कित्येकांचा नातेवाईकांच्या घरी पैसा होता. तर कित्येकांनी दुसऱ्याच्या नावावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचेही समोर आले आहे. या कारवाईने उत्तर महाराष्ट्रातील अफाट माया कमावणाऱ्या बिल्डर आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

दरमहा भरा अवघे २१० रुपये, 'या' सरकारी योजनेत पती-पत्नीला मिळेल १० हजाराची पेन्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधान परिषद निवडणुकीत अमरिशभाई पटेल विजयी !

December 3, 2020

महावितरणच्‍या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन

January 21, 2022

मुक्ताईनगरात दोन कोटींचे गुटखा जप्त प्रकरण ः यंत्रणेच्या रडारवर आता पुरवठादारासह खरेदीदार

December 3, 2024

अमळनेर : तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

June 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group