TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावला मिळणार नवीन सुसज्ज प्रांत कार्यालय व अत्याधुनिक व्हीआयपी विश्रामगृह !

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव मतदारसंघातील विकासकामांसाठी 55 कोटींचा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले असून आज दि.१७ जुलै रोजी पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. मतदारसंघाच्या विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.

मंजूर झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे.

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

 

१) नवीन प्रांत कार्यालय व प्रांताधिकारी – तहसीलदार निवासस्थाने – 6 कोटी !

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे स्वतंत्र महसुली उपविभाग आहे, सद्यस्थितीत चाळीसगाव प्रांताधिकारी कार्यालय हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत भाड्याच्या जागेत सुरु आहे. तसेच ते वर्दळीच्या ठिकाणी व अंतरावर असल्याने नागरिकांना गैरसोयीचे देखील होत होते. त्यामुळे चाळीसगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी नवीन प्रांत कार्यालय व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने देखील नसल्याने सुसज्ज अश्या प्रांत कार्यालयासाठी तसेच निवासस्थाने बांधकामासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा करून यासाठी 6 कोटी निधी मंजूर केला आहे,

 

२) ग्रामीण रुग्णालयाजवळच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम – 13 कोटी 22 लाख !

चाळीसगाव शहरातील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय देखील प्रस्तावित आहे. मात्र तेथे कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान नसल्याने त्यांच्यासह रुग्णांची देखील गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत या अर्थसंकल्पात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी ग्रामीण रुग्णालयाजवळच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी 13 कोटी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत.

३) नवीन व्हीआयपी विश्रामगृह बांधकाम – 9 कोटी 38 लाख !

छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे अनेक केंद्रीय व राज्यमंत्री, शासकीय अधिकारी, उद्योजक, महत्वाचे पदाधिकारी यांची ये जा सुरू असते. सद्यस्थितीत जुन्या शासकीय विश्रामगृहाची अवस्था मोडकळीस आल्यामुळे त्याच्याच बाजूला व्हीआयपी विश्रामगृह बांधकामासाठी 9 कोटी 38 लाख निधी या अधिवेशनात मंजूर करण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे. या नवीन विश्रामगृहामुळे चाळीसगावच्या लौकिकात भर पडणार आहे.

 

४) १२ ग्रामीण रस्ते सुधारणा कामे – २६ कोटी १० लाख !

ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी यापूर्वी देखील मोठा निधी आमदार मंगेश चव्हाण यांनी खेचून आणला आहे, या अधिवेशनात देखील मतदारसंघातील 12 रस्त्यांच्या कामांसाठी 26 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने दळणवळणाची साधने अधिक मजबूत होणार आहेत.

मंजूर झालेल्या रस्ते व पुलांची कामे पुढीलप्रमाणे –

१ – हातगाव व रोहिणी गावातील लांबीत सिमेंट कॉंक्रीट करणे – २ कोटी ५० लक्ष

२ – शामवाडी ते निमखेडी रस्ता – ८० लक्ष

३ – दस्केबर्डी ते जामदा रस्ता – २ कोटी ६० लक्ष

४ – तरवाडे गावाजवळ सिमेंट काँक्रीट रस्ता करणे – १ कोटी ८० लक्ष

५ – धामणगांव ते शिदवाडी रस्ता – १ कोटी ४० लक्ष

६ – पिंपरखेड ते राम-211 हायवे – २ कोटी ५० लक्ष

७ – पिंप्री प्रदे चौफुली ते काकडणे फाटा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष

८ – काकडने फाटा ते तमगव्हाण रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष

९ – देशमुखवाडी ते सायगाव रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे. – २ कोटी ५० लक्ष

१० – सायगाव ते तळोदे फाटा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष

११ – माळशेवगे ते हिरापूर रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष

१२ – उंबरखेड येथे गटारीसह सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे – २ कोटी

 

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुक्याची सर्वांगीण विकासाकडे घोडदौड सुरु…!

नवीन सरकार स्थापन आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षभरात चाळीसगाव मतदारसंघाच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला असून अनेक कामे पूर्णत्वास देखील येत आहेत. सामाजिक कार्यासोबतच विकासात्मक कामांमध्ये देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तालुक्यातील जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन मतदारसंघाचा चौफेर विकास होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
Next Post

अमळनेर जी.एस.हायस्कूलला मिळणार ५० लाखांचा निधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बुद्धिबळ पटावर चिमुकल्यांच्या तीक्ष्ण चाली रंगत वाढी…

August 4, 2025

सरसंघचालक भागवत यांचे धर्मांतरावर मोठे विधान ; ‘हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करणार’

December 16, 2021

धरणगाव शासकीय विश्राम गृहाचा विद्युत पुरवठा खंडित !

November 16, 2021

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक संपर्कात’ : देवेंद्र फडणवीस

November 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group