TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ रोवर मशीनचे वाटप, मोजणी करतांना येणार अचूकता आणि पारदर्शकता, तंटे मिटणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2024
in जळगाव, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

धरणगाव (प्रतिनिधी) भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तात्काळ मोजणी करता येवून जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे. बांधावरून भावकीचे आपापसात वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार असून शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथील नगरपालिका सभागृहात आयोजित रोव्हर मशीन वाटपा प्रसंगी बोलत होते.
जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या‎ अडचणी आणि भूमिअभिलेख‎ कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या‎ बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची‎ होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी यावर्षी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा रोवर मशीन वाटप करण्यात आला यासाठी १ कोटी ८० लक्ष निधीची जिल्हा नियोज मधून तरतूद करण्यात आली आहे. तर मागील वर्षी १२‎ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे‎ भूमिअभिलेख कार्यालयास‎ देण्यात आली आहेत. यासाठी १ कोटी‎ २० लाख निधी खर्च केले गेला होता. भूमिअभिलेख कार्यालयातर्फे‎ जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या‎ अभिलेख्यांचे जतन करण्यासह‎ नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या‎ जमिनींचे मापन करण्यात येते. यात‎ हद्दी निश्‍चित केल्यानंतर बिनशेती,‎ ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान‎ आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख‎ तयार केले जातात.
आजवर या सर्व‎ प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक‎ पद्धतीत पार पाडल्या जातात.‎ यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ‎ तर लागतेच पण अनेक ठिकाणी‎ झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे‎ जमीन मोजणीत मोठ्या अडचणी‎ येत होत्या. रोवर यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहेरोवर मशीनमुळे मोजणी करतांना येणार अचूकता आणि पारदर्शकता रोव्हर मशीनमुळे तास किंवा काही मिनिटाच्या आत मोजणी काम करता येते. मागील वर्षांपासून आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन (DPDC) मार्फत हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. या मशिनच्या सहाय्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. रोवर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते.
प्रास्ताविकात जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर यांनी योजनेची माहिती विशद करून होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप अधीक्षक एरोंडोल श्री. बी सि अहिरे यांनी केले. तर आभार श्री. पी एस पाटील नगर भुमापन अधिकारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी , श्री. मनोज चव्हाण, रतिलाल शिरसाठ, नुपम मेढे, कृष्णा भट, संजय सोनार,रोहिदास चव्हाण, विजय पाटील, रवींद्र महाजन, सुरेश वाडे प्रशांत कोळेकर, गोपाळ पाटील रवींद्र कदम, जिल्ह्यातील अन्य कर्मचारी व नागरिक
यांची होती उपस्थिती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहुणबारे गुटखा प्रकरण : एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली

October 31, 2020

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026

मेहरुणमधील जोशीवाड्यात दोन गटात दगडफेक !

November 13, 2024

राज्यसभेला मविआचा पत्त्यांचा बंगला हलला, विधान परिषदेला थेट कोसळेल : फडणवीस

June 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group