जळगाव (प्रतिनिधी) जळगाव सराफ बाजारात आज सोने आणि चांदीचे (Gold and silver) दर मोठ्या किंमतीने घसरले आहे. मंगळवारी सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी ९४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आजच्या घसरणीनंतर सोने ४९ हजाराच्या खाली आले आहे.
आजचा सोने-चांदीचा दर?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ४८,८३० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,१९० रुपये इतके आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. १ जानेवारी २०२१ रोजा १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,३३० इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६९,७०० रुपये इतका होता. विशेष म्हणजे २०२१ मध्ये सोन्याच्या किंमतीत ४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सध्या भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आगामी काळात वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहे. यावर्षी २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.