TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“फडणवीस यांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुबई (वृत्तसंस्था) देशातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. असे सर्व सुरु असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण पुतण्याने त्याआधीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याने काँग्रेसने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करुन ‘फडणवीस यांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

देशात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणालाच परवानगी देण्यात आलेली असून, देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपण दुसरा डोस घेतल्याचं त्याने म्हटलं होतं. यावरून महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

तन्मय फडणवीस याचा लस घेतानाचा फोटो पोस्ट करत काँग्रेसने काही सवाल भाजपाला केले आहेत. “नाव… तन्मय फडणवीस, कोण… देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तन्मय फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल, तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,” असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले आहेत.

“४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!,” असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

तन्मयने लस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. मात्र, यावरून अनेकांनी शंका आणि प्रश्न उपस्थित केल्या. त्यानंतर हा फोटो डिलीट करण्यात आला. पण तोपर्यंत हा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तन्मय हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. तन्मयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘अॅक्टर’ असे लिहिले असून इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये ‘पब्लिक फीगर’ असा उल्लेख आहे. अभिजीत फडणवीस हे शोभा फडणवीस यांचे पुत्र आहेत. शोभा फडणवीस या विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री देखील होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात ; दोन जणांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेरमध्ये मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार…!

September 6, 2020

माजी नगरसेवक राजु फाफोरेकर यांच्याकडून अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप.

November 15, 2020

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ४०९ बरे, २ जणांचा मृत्यू !

February 8, 2022

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९८६ कोरोनाबाधित, ४१८ झाले बरे !

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group