TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव एम. आय. डी. सी. ला डी ± दर्जा; ऐतिहासिक निर्णय

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला निर्णय

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना डी ± दर्जा (सवलतींचा झोन) देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे संपूर्ण जिल्हाच डी ± झोनमध्ये समाविष्ट झाला असून, स्थानिक उद्योजकांसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आ.सुरेश भोळे ( राजूमामा भोळे ),आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,आ.किशोर आप्पा पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.अमोल पाटील, आ.अमोल जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि यावल या पाच तालुक्यांनाही डी ± दर्जा मिळाला. याआधी जिल्ह्यातील १० तालुके आधीच डी ± झोनमध्ये होते. आता संपूर्ण जिल्हाच सवलतींच्या झोनमध्ये आला आहे.

औद्योगिक गुंतवणुकीस चालना
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “डी ± दर्जा मिळाल्यामुळे उद्योगांना हक्काच्या सवलती मिळतील. स्थानिक तरुणांसाठी रोजगार संधी वाढतील. जिल्ह्याचा औद्योगिक पाया अधिक बळकट होईल. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.”

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “जळगाव जिल्हा अनेक वर्षांपासून औद्योगिक सवलतीपासून वंचित होता. सातत्याने उद्योग विभागाकडे पाठपुरावा करून अखेर हा निर्णय मिळविला. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या समतोल औद्योगिक विकासाला चालना मिळेल. स्थानिक अर्थचक्राला बळकटी, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा वाढीसाठी हे पाऊल निर्णायक ठरेल.”

डी ± दर्ज्यामुळे मिळणाऱ्या प्रमुख सवलती

▪️नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना १० वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करामधून (एस. जी. एस. टी.) १०० टक्के परतावा
▪️विस्तार करणार्‍या उद्योगांना ९ वर्षांसाठी एस. जी. एस. टी. परतावा
▪️मुदत कर्जावर ५ टक्के व्याज परतावा
▪️वीज दर व वापरावर सवलत, वीज शुल्क माफी
▪️पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती

नवीन एम. आय. डी. सी. क्षेत्रांसाठी वेग

कुसुंबे, चिंचोली आणि पिंपळे येथे एकूण २८५.३१ हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहती विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे. यासाठी उद्योगमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि एम. आय. डी. सी. अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. तसेच, जळगाव एम. आय. डी. सी. मध्ये मंजूर झालेल्या ई. एस. आय. सी. रुग्णालयासाठी निवडलेला भूखंड अद्याप हस्तांतरित झालेला नसल्यामुळे तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

राजकीय एकजूटीमुळे ऐतिहासिक निर्णय

या बैठकीस जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींसह विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरबु, उद्योग संचालक सदाशिव सुरवसे, सहसंचालक चेतन पाटील, महाव्यवस्थापक गांधील, कार्यकारी अभियंता एम. आय. डी. सी., तसेच लघु उद्योग संघटनांचे प्रतिनिधी संतोष इंगळे, रवी फालक, किशोर डांगे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाला, असे बोलले जात आहे.

उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण

“संपूर्ण जिल्हा डी ± झोनमध्ये आल्यामुळे उद्योगांना अपेक्षित सवलती मिळणार आहेत. त्यामुळे नव्या उद्योगांची स्थापना व विस्तार शक्य होणार आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक उद्योजकांनी दिली.
हा निर्णय जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत मैलाचा दगड ठरणार असून, मोठ्या, मध्यम व लघु उद्योजकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा !

October 11, 2022

जीवलग मित्रांत जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

July 28, 2025

जिल्हा दुध संघ निवडणूक : महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय !

November 15, 2022

खेळतांना नदी पात्रात पाय घसरून बालकाचा मृत्यू ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

October 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group