धरणगाव (प्रतिनिधी) येथील मूळ रहिवासी सेवानिवृत्त महावितरणचे कर्मचारी स्व.चुडामण श्रीधर चौधरी यांचे नातू व ईलियान फार्माचे उत्तर महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर गणेश चुडामण चौधरी यांचे सुपुत्र अथर्व चौधरी याने “महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत” (MTS) धुळे केंद्रात द्वितीय क्रमांक संपादन केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेंट झेवीयर कानोसा स्कूल, धुळे येथील अथर्व गणेश चौधरी इयत्ता दुसरीतील विद्यार्थी याने महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत द्वितीय क्रमांक संपादन केला. अथर्व चौधरी याला ३०० पैकी २२८ गुण मिळाले असून त्याला प्रिन्सिपल सिस्टर ज्युली, टीचर मिस वसंता, मिस रेणुका, क्लास सिस्टर गलेंडा यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल अथर्वला आई वैशाली चौधरी व पिता गणेश चौधरी, प्रा. डॉ. नितीनकुमार माळी, नवापूर यांचे मार्गदर्शन लाभले. अथर्वला मिळालेल्या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. धरणगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या गणेश चौधरी यांच्या मुलाने मिळविलेल्या या यशाबद्दल गावातील अनेक व्यक्तींनी सदिच्छा व्यक्त केल्या. यामध्ये छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र मराठे, श्री. क्लिनिकल लॅबोरेटरी चे संचालक नरेंद्र पाटील, एलआयसी चे विमा सल्लागार विनोद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भिमराज पाटील, दीपक माळी आदी मान्यवरांचा समावेश आहे.