TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरक्षादूत म्हणून विद्युत सुरक्षेचा जागर करा

vijay waghmare by vijay waghmare
September 23, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – विद्युत सुरक्षेसाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि सुरक्षादूत म्हणून विद्युत सुरक्षेचा सर्वत्र जागर करावा. तसेच पर्यावरणाचा समतोलासाठी व भविष्य सुरक्षित करण्यासाठी हरित ऊर्जेचा अंगीकार करा, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिला.
येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट येथे बुधवारी (दि. २३) ‘ऊर्जा प्रबोधन’ कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. एरव्ही प्रशासकीय कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या संचालक श्री. पवार यांनी एका शिक्षकाची भूमिका साकारत वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि वीजसुरक्षेसह हरित ऊर्जेचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले.
‘अभियंता दिना’चे औचित्य साधून आणि गणेशोत्सवाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरात विशेष ‘ऊर्जा प्रबोधन मोहीम’ राबवली जात आहे. या पंधरवड्याच्या मोहिमेअंतर्गत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करत आहेत. या अभियानात स्वतः श्री. पवार यांनी जळगावात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संचालक श्री. पवार म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगात विजेचा वापर वाढला आहे. परंतु त्यासोबतच निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे. इतर गोष्टींचे नुकसान भरून काढता येते पण एकदा गेलेला मानवी जीव पुन्हा परत आणता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने वीज वापरताना सुरक्षेचे नियम पाळले पाहिजेत. सतर्क राहिले पाहिजे. विद्यार्थी हे समाज परिवर्तनाचे आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहेत. विद्यार्थ्यांनी विद्युत सुरक्षेचे नियम आत्मसात करावे आणि सुरक्षादूत म्हणून आपल्या कुटुंबात, नातेवाईकांत आणि मित्रपरिवारात त्याचे महत्त्व पटवून द्यावे असे आवाहन संचालक श्री. पवार यांनी केले.
संचालक श्री. पवार यांनी सांगितले की, औष्णिक प्रकल्पांमध्ये कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते. परिणामी पर्यावरणाची अपरिमित हानी होते. हे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक व राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. केद्र व राज्य शासन आणि महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफटॉप सोलर योजना आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजना यासारख्या विविध सौर ऊर्जा योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन समाजात जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. आय. ए. मुलाणी, रायसोनी कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, अधिष्ठाता डॉ. संजय शेखावत आणि विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. बिपासा पात्रा, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

READ ALSO

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitaran Director Pawar Conducts Electrical Safety Session at Raisoni!

Related Posts

जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवार तिथे गोदाम योजनेला प्रोत्साहन देणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ग्वाही !

August 10, 2023

डबल मर्डर ; चोरटयांनी चोरी करून केली सासू-सुनेची निर्घृण हत्या !

August 16, 2022

जळगाव : केवायसी अपडेटच्या नावाखाली एकाची १ लाख ९० हजाराची फसवणूक !

October 31, 2022

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून वानवडीतील घटनास्थळी पाहणी

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group