TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी !

लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी घेतली बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करा

जळगावातील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी काय व्यवस्था हवी, नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचना मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी दिल्या.

महापौरांनी केल्या सूचना

लसीकरण केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रसार माध्यमातून देखील तसे वृत्त प्रकाशित झाले आहे. लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध आहे की नाही याबाबत दर्शनी भागात फलक लावावा, उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी ग्रीन नेट किंवा मंडप टाकावे, बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, मनुष्यबळ वाढवावे, नियोजन ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास प्रत्येक लसीकरण केंद्रावर २ महिला, २ पुरुष सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शहरात लसीकरण केंद्रे वाढवा

शहरातील पिंप्राळा, जुने जळगाव, हरीविठ्ठल नगरसह इतर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांना अनुसरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या.

पॉझिटिव्ह रुग्णांचा १०० टक्के शोध घ्या

जळगाव शहरात गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण कुठे आहेत याचा देखील शोध घेतला जात नसल्याची माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व रुग्णांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णांचा शोध घ्यावा आणि जे नियम मोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. दररोज १०० टक्के रुग्ण शोधले जायला हवे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम चोख राबवा

राज्य सरकारने जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहे. जळगाव शहरात देखील मोहीम चोखपणे राबविण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर प्रत्येक घरी जाऊन तपासणी करा. मोहिमेत सहभागी होण्यासाठी जे टाळाटाळ करीत असतील त्यांना नोटीस बजावावी. मोहिमेत फिरणाऱ्या रोजे असलेल्या शिक्षकांना सकाळच्या वेळी आणि दुपारनंतर आपले कार्य पार पाडण्याची सवलत द्यावी. पुढील १५ दिवसात संपूर्ण मोहीम पार पाडण्यात यावी, अशा सूचना देखील महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
Next Post

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबियात हाणामारी ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा ! : शिवसेना

February 4, 2021

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ९४.५५ टक्के मतदान !

April 28, 2023

राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती ; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

July 23, 2021

‘डुकराशी कुस्ती खेळू नये’ ; मलिकांच्या आरोपांना फडणवीसांचं अप्रत्यक्ष प्रत्युत्तर

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group