धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत गारखेडा शिवारातील नोबेल पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडलीय. पंकज अशोक सोनवणे (रा.बोरखेडा ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात पो.कॉ विलास जयराम पाटील (नेमणूक धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. १२ मार्च साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपी याने त्याचा ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने हयगयीने रस्त्याचा परीस्थीतीकडेस दुर्लक्ष करून चालवत होता. त्याच्या वाहनाच्या धडकेत पंकज अशोक सोनवणे हा तरुण मयत झाला. दरम्यान, अज्ञात वाहन धारकाने पोलीस स्थानकास अपघाताची माहिती न देता पळून गेला. या संदर्भात अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत.