धरणगाव (प्रतिनिधी) येथील जनकल्याण नागरी पतसंस्थेत तज्ञ संचालक म्हणून दिलीप हिलाल मराठे व सुनिल एकनाथ चौधरी यांचा नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे चेअरमन शिरीष बयस, उपाध्यक्ष हितेश पटेल, जेष्ठ संचालक पुंडलिक व्हराडे, रघुनाथ चौधरी, राजेंद्र पाटील,कमलेश तिवारी,महेश आहेराव,शरद भोई,लोटन धनगर, महेंद्र पाटील, पतसंस्थेचे मॅनेजर दिपक चौधरी यांनी नवनियुक्त तज्ञ संचालक दिलीप मराठे व सुनील चौधरी यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.